Cotton Candy Banned in Tamil Nadu: तामिळनाडूमध्ये 'बुडी के बाल'च्या विक्रीवर बंदी; कॅन्सर निर्माण करणाऱ्या विषारी रसायनामुळे घेण्यात आला निर्णय

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अखेर बुडी के बालवर बंदी घालण्यामागचं कारण काय? सरकारी अधिकाऱ्यांना याच्या निर्मितीमध्ये विषारी रसायनांचा वापर आढळून आला आहे.

Cotton Candy (PC - Pexels)

Cotton Candy Banned in Tamil Nadu: तामिळनाडू तसेच पुद्दुचेरी (Puducherry)मध्ये कॉटन कँडी (Cotton Candy) च्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तुम्ही हे बरोबर ऐकलं. लहान मुलांना आणि मोठ्यांना आवडणारी ही कॉटन कँडी आता तामिळनाडू (Tamil Nadu) मध्ये मिळणार नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अखेर बुडी के बाल (Budi Ke Baal) वर बंदी घालण्यामागचं कारण काय? सरकारी अधिकाऱ्यांना याच्या निर्मितीमध्ये विषारी रसायनांचा वापर आढळून आला आहे. पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी गुरुवारी एका व्हिडिओमध्ये बंदीची घोषणा केली. त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर क्लिप शेअर करून, राज्यपालांनी जनतेला मुलांसाठी कॉटन कँडी खरेदी न करण्याचे आवाहन केले. कारण त्यात असणाऱ्या रसायनामुळे संपूर्ण शरीराला हानी पोहोचवते.

व्हिडिओमध्ये, तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी खुलासा केला की, कॉटन कँन्डीमध्ये अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना रोडामाइन-बी हा विषारी पदार्थ आढळला आहे. राज्यपालांनी अपीलात म्हटले आहे की, पुद्दुचेरीतील मुले आणि इतर लोक वापरत असलेल्या कॉटन कँडीमध्ये 'रोडामाइन बी' नावाचा विषारी पदार्थ वापरला जात असल्याचे आढळून आले आहे. (हेही वाचा - mRNA Cancer Vaccine Trial: कॅन्सर वरील उपचारांमध्ये आता 'mRNA'लस संजीवनी ठरणार? UK मध्ये ट्रायल्स सुरू)

क्लिपसोबत, त्यांनी कॅप्शन लिहिलं आहे की, "मुलांसाठी रासायनिक कॉटन कँडी खरेदी करू नका. ज्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो..." नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ (NIH.gov) नुसार, रोडामाइन बी हे सहसा आरएचबी म्हणून संक्षिप्त केले जाते आणि ते एक रासायनिक संयुग आहे जे रंग म्हणून कार्य करते. (हेही वाचा - Heart Attack Patient's Miraculous Recovery: शस्त्रक्रियेशिवाय, आयुर्वेदिक थेरपीने बरा झाला हृदयविकाराचा रुग्ण; 90% ब्लॉकेजेस झाले कमी, जाणून घ्या सविस्तर)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamilisai Soundararajan (@tamilisaisoundararajan)

रोडामाइन बी अन्नामध्ये मिसळल्यावर ते शरीरात पेशी आणि ऊतींवर ऑक्सिडेटिव्ह ताण निर्माण करते. इतकंच नाही तर रोडामाइन बीचा दीर्घकाळ वापर केल्यास यकृत आणि कर्करोगासारख्या समस्या उद्भवू शकतात.