Madya Pradesh Double Murder Case: मध्य प्रदेशात दुहेरी हत्याकांड, आई आणि मुलीची धारदार शस्त्राने हत्या

या घटनेअंतर्गत पोलिसांन चौकशी सुरु केली आहे.

Murder प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

Madya Pradesh Double Murder Case:मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये एक धक्कादायक घटना समोर येत आहे. येथे अज्ञातांनी घरात घुसून एका 80 वर्षीय महिला आणि तिच्या 55 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली आहे. मध्य प्रदेश शहरात वाढत्या गुन्हेगारींमुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी दुपारी दोघांच्या डोक्यात शस्त्राने जीवघेणा हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांनी अज्ञाताविरुध्दात गुन्हा दाखल केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बालाघाट येथील कोतवाली परिसरातील रेल्वे स्टेशन रोडवर असलेल्या एका घरात ही घटना घडली. घरात आई आणि मुलगी आणि केअर टेकर राहत होत्या. दुपारच्या वेळी अज्ञातांनी घरात घुसुन दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोघांनाही डोक्यावर जखमा झाल्या. दोघांचा ही जीवघेण्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. चंद्रावती लिल्हारे असं मृत वृध्द महिलेचे नाव होते तर फुलवंती सुलाखे असं मृत महिलेचे नाव होते. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामे केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

पोलिसांना सध्या घटनास्थळी हल्लेखोरांबाबत कोणताहा सुगावा मिळालेला नाही. पोलिसांनी घटनेअंतर्गत चौकशी सुरु केली आहे. घटनेच्या तपासासाठी श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथके तैनात करण्यात आली आहेत. या दोन्ही पथकांनी घटनास्थळावरून नमुने घेऊन आपापल्या पद्धतीने तपास सुरू केला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif