ATM Fraud: पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 61 खातेदारांची ATM च्या माध्यमातून फसवणूक; असे ठेवा आपले पैसे सुरक्षित

पीएनबीच्या अधिकाऱ्यांनी या खातेदारांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली आहे. आता पोलीस या घटनेची पुढील चौकशी करत आहेत.

Punjab National Bank (Photo Credits: PTI | Representational Image)

New Delhi: मागच्या वर्षी नोटबंदीनंतर सरकारने कॅशलेस व्यवहारांवर (Cashless Transactions) भर दिला. त्यासाठी जनजागृतीदेखील करण्यात आली, तरी पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) दिल्ली येथील वसंत विहार (Vasant Vihar) शाखेत एक धक्कादायक घटना घडली आहे. पीएनबीच्या वसंत विहार शाखेत तब्बल 61 खातेदारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या खातेदारांच्या खात्यातून एकूण 15 लाख रक्कम काढून घेतली आहे. पीएनबीच्या अधिकाऱ्यांनी या खातेदारांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली आहे. आता पोलीस या घटनेची पुढील चौकशी करत आहेत.

सध्या डीजीटल पेमेंटवर भर दिला जात आहे, मात्र यामुळे परस्पर लोकांच्या खात्यातून पैसे काढून घेण्याच्या घटनादेखील वाढल्या. सध्या पीएनबीमध्ये अशीच घटना घडली आहे, जिथे एटीएम (ATM) च्या माध्यमातून 61 लोकांची फसवणूक झाली आहे. खातेदारांकडे त्यांचे डेबिट कार्ड असूनही परस्पर ही रक्कम काढून घेतली गेली आहे. 8 एप्रिलच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

आजकाल ऑनलाइन बँकिंग, मोबाइल बँकिंग, फोन बँकिंग आणि ऑटोमेटेड टेलर मशीन (ATM) च्या माध्यमातून फसवणूक होण्याच्या घटना वाढत आहेत. अशावेळी आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काही मार्गांचा अवलंब करणे फायद्याचे ठरेल. (हेही वाचा: एटीएमच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या महिलेने तब्बल 17 दिवस पाळत ठेवून चोराला पकडले)

> वापरकर्त्यांना त्यांच्या डिव्हायसेससाठी ऑटोओलॉक सक्षम करणे आवश्यक आहे

> आपला फोन चोरी झाल्यास लोकांना त्याचा वापर करण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी आपल्या सिमसाठी पिन घालून ठेवा.

> आपल्या मेमरी कार्डासाठी पासवर्ड सेट करा.

दरम्यान, सायबर हल्ला अथवा ऑनलाईन फसवणूक करून पैसे लंपास करण्याचा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. वर्षातील सर्वात मोठा सायबर हल्ला कॉसमॉस बँकेच्या सर्व्हर करण्यात आला होता़. हकर्सनी एकाच वेळी 29 देशातून अडीच हजार क्लोन व्हिसा आणि रुपे कार्डचा वापर करुन तब्बल 94 कोटी रुपयांची चोरी केली होती. तर पुण्यात एका वर्षात तब्बल साडेपाच हजार लोकांना या ऑनलाईन चोरांनी गंडा घालून, कोट्यावधी रुपये लंपास केले आहेत.