Arvind Kejriwal Will Return To Tihar Jail Tomorrow: अरविंद केजरीवाल यांना न्यायालयीन दिलासा नाही, उद्या तिहार तुरुंगात परतणार

त्यामुळे केजरीवाल यांना उद्या 2 जून रोजी तिहार तुरुंगात जाऊन आत्मसमर्पण करावे लागणार आहे. न्यायालयाने निवडणूक प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांची 10 मे रोजी 21 दिवसांच्या अंतरिम जामिनावर सुटका केली होती.

(Photo Credit - Arvind Kejriwal)

Arvind Kejriwal Will Return To Tihar Jail Tomorrow: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या अंतरिम जामीन अर्जावर न्यायालयाने निर्णय दिलेला नाही. या याचिकेवर 5 जून रोजी निर्णय होणार आहे. त्यामुळे केजरीवाल यांना उद्या 2 जून रोजी तिहार तुरुंगात जाऊन आत्मसमर्पण करावे लागणार आहे. न्यायालयाने निवडणूक प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांची 10 मे रोजी 21 दिवसांच्या अंतरिम जामिनावर सुटका केली होती. त्याच्या जामिनाची मुदत 2 जून रोजी संपत असून रविवारी त्यांना शरण जावे लागणार आहे.

तत्पूर्वी, केजरीवाल यांनी आपली खराब प्रकृती आणि वैद्यकीय चाचणीचे कारण देत अंतरिम जामीन आणखी 7 दिवस वाढवण्याची विनंती केली आहे. या याचिकेवर शनिवारी न्यायालयात सुनावणी झाली. केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाच्या मुदतवाढीला ईडीने विरोध केला. केजरीवाल यांच्या बाजूने एन हरिहरन कोर्टात हजर झाले आणि एएसजी एसव्ही राजू हे तपास यंत्रणा ईडीतर्फे हजर झाले. (हेही वाचा - Black Magic: कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकार पाडण्यासाठी केली काळी जादू; दिला 21 शेळ्या, 3 म्हशी, 21 काळ्या मेंढ्या आणि 5 डुकरे यांचा बळी, DK Shivakumar यांचा दावा)

यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हेही ऑनलाइन सुनावणीसाठी उपस्थित होते. त्यांनी असा युक्तिवाद केला की, काल शुक्रवारी केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन 2 जून रोजी आत्मसमर्पण करणार असल्याचे सांगितले होते. दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर राऊस एव्हेन्यूच्या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी सुनावणी पूर्ण झाल्याचे सांगितले. आता अंतरिम जामिनावर न्यायालय 5 जून रोजी निकाल देणार आहे.

तथापी, एन हरिहरन यांनी अरविंदची बाजू मांडताना सांगितले की, ईडी असे सुचवण्याचा प्रयत्न करत आहे की जो आजारी आहे किंवा त्याची वैद्यकीय स्थिती वाईट आहे त्याला उपचार मिळणार नाहीत? कलम 21 नुसार हा माझा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला जामीन अर्ज दाखल करण्याची परवानगी दिली होती. त्याच आधारावर आम्ही नियमित आणि अंतरिम जामीन मागितला आहे. वकिलाने न्यायालयाला सांगितले की, केजरीवाल सध्या त्यांच्या प्रकृतीच्या स्थितीमुळे नियमित जामीन नसून अंतरिम जामीन मागत आहेत. 1994 पासून ते मधुमेहाने त्रस्त आहेत. ते दररोज इन्सुलिनचा डोस घेतात.