Arunachal Musician Kills Chicken: कृरतेचा कळस! भरकार्यक्रमात कोंबडीला कापले...रक्त पिले...;अरुणाचल प्रदेशमध्ये संगीतकार कोन वाई सोनविरुद्ध गुन्हा दाखल

इटानगरमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमादरम्यान सार्वजनिक ठिकाणी कोंबडीचा गळा कापून तिचे रक्त प्यायल्याप्रकरणी संगीतकार कोन वाई सोन विरुद्ध एफआयआर नोंदवला गेला आहे असे अरुणाचल प्रदेश पोलिसांनी मंगळवारी त्याबाबतची माहिती दिली.

Arunachal Musician Kills Chicken : अरुणाचल प्रदेशमधून नुकतीच धक्कादायक घटना समोर आली आहे. संगीतकार कोन वाई सोन (Kon Waii Son) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इटानगरमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमादरम्यान त्याने सार्वजनिक ठिकाणी कोंबडीचा गळा कापून तिचे रक्त प्यायला संतापजनक प्रकार केला होता. पोलिस अधिकाऱ्यांनी मंगळवारी या प्रकरणी माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय न्याय संहिता (बीएनएस), 2023 आणि द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू एनिमल्स (पीसीए) कायदा, 1960 अंतर्गत कोन वाई सोन विरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

कोन वाई सोन हा अरुणाचल प्रदेशच्या पूर्व कामेंग जिल्ह्यातील सेप्पाचा आहे. एक गीतकार, संगीतकार आणि संगीतकार आहे. कोंबडीचा गळा कापून तिचे रक्त प्यायल्यानंतर, पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स (पेटा), इंडियाने त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी इटानगर पोलिस स्टेशनमध्ये कोन वाई सोनविरुद्ध एफआयआर दाखल केला.

28 ऑक्टोबर रोजी एका कार्यक्रमादरम्यान त्याने हा प्रकार केला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्याने त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. (Bihar: छठघाट साफ करताना तीन बालकांचा बुडून मृत्यू, कुटुंबात पसरली शोककळा)

पोटा इंडियाने एका निवेदनात म्हटले की, प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्यांचे मनोवैज्ञानिकीकरण गरजेचे आहे. त्यांना समुपदेशन मिळावे, कारण प्राण्यांवर अत्याचार करणे गंभीर मानसिक अस्वस्थता दर्शवते. संशोधनात असे दिसून आले आहे की जे लोक प्राण्यांवर क्रूरता करतात ते मानवांनाही दुखावतात, असे पोटाने म्हटले.