Madhya Pradesh: शाळेच्या फीसवरून वाद, मुख्यध्यापक आणि विद्यार्थ्यामध्ये मारामारी, दोघांकडून तक्रार दाखल (Watch Video)

ही घटना हाजिरा भागातील असल्याची माहिती आहे.

Fight between principal and student Photo Credit TWITTER

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या खासगी शाळेच्या मुख्याध्यापक आणि ११ वीच्या विद्यार्थ्यामध्ये जोरदार भांडण झाल्याचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना हाजिरा भागातील असल्याची माहिती आहे. कांच मिल परिसरातील सीबीएस शाळेत ही घटना घडली. हेही वाचा- नाशिकमध्ये 32 वर्षीय ट्यूशन शिक्षकाकडून पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग; गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, ध्रुव असं विद्यार्थ्याचे नाव आहे. तर निशा सेंगर असं मुख्याध्यापकाचे नाव आहे.इयत्ता 11वीत नापास झाल्यानंतर त्याचे ट्रान्सफर सर्टिफिकेट (TC) घेण्यासाठी शाळेत गेला होता. मात्र, त्यावेळीस मुख्याध्यापिका आणि विद्यार्थीचा फी न भरण्यावरून वाद झाला होता. ध्रुवने दावा केला की, त्याने सर्व फी भरली आहे. तर मुख्याध्यापक म्हणाले की, जर फी न भरसल्यास तुमचा टीसी जारी करू शकणार नाही. (हेही वाचा- आदर्श विद्यालय बदलापूर मध्ये मुलींसोबत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी SIT स्थापन, शाळेविरूद्ध कारवाईचे CM Eknath Shinde यांचे आदेश)

मुख्यध्यापकांनी विद्यार्थ्यास मारहाण केली पाहा व्हिडिओ 

काही वेळातच दोघांमध्ये भांडण सुरु झाले. मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला मारहाण केली. घटनास्थळी उपप्राचार्य राकेश सिंह उपस्थित झाले. विद्यार्थ्याला मारहाण केली. त्याने स्वत: चा बचा व करण्यासाठी मुख्याध्यपकांना ढकलून दिले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. मारहाणीत विद्यार्थ्याच्या मानेला आणि हाताला दुखापत झाली.

दोघांन्ही या प्रकरणी ग्वाल्हेर पोलिसांना तक्रार केली. पोलिसांनी दोन एफआयआर दाखल केले. मुख्यध्यापकांनी विद्यार्थ्यासह मारहाण केली. तर विद्यार्थ्याने मुख्यध्यापकास शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे तक्रार नोंदवला. पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहे. शाळेतील कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif