Agra Woman Bites Off Man's Ear: गेट बंद न केल्यावरून झालेल्या वादात आग्रा येथील महिलेने घेतला पुरुषाच्या कानाचा चावा
राखी नावाची ही महिला इतर भाडेकरूंसोबत जवळपास रोजच वाद घालत असते.
Agra Woman Bites Off Man's Ear: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्रा (Agra) जिल्ह्यातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या शेजाऱ्यांमध्ये गेट न लावण्यावरून वाद झाला. हे प्रकरण इतके वाढले की, दोघांमध्ये हाणामारी झाली. एवढेच नाही तर महिलेने शेजारी राहणाऱ्या पुरुषाच्या कानाचा चावा (Woman Bites Off Man's Ear) घेतला. थुंकायला सांगितल्यावर तिने चावलेला भागही गिळला.
गेट उघडण्यावरून झाला वाद -
पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत, रिक्षाचालक रामवीर बघेल या व्यक्तीने सांगितले की, तो आणि महिलेचे कुटुंब शहरातील न्यू आग्रा परिसरातील निवासस्थानात सह-भाडेकरू आहेत. राखी नावाची ही महिला इतर भाडेकरूंसोबत जवळपास रोजच वाद घालत असते. (हेही वाचा -Firozabad Shocker: फिरोजाबादमधील शाळेत खेळताना गेला दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; हृदयविकाराचा झटका आल्याची शंका)
4 मार्च रोजी मुलाची परीक्षा असल्याने तो त्याला सकाळी 6 च्या सुमारास सोडायला गेला. मात्र, तो घाईघाईत निघून गेल्याने आणि गेट बंद न केल्याने राखीने रामवीरला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती अधिकच चिडली. त्यानंतर राखीचा पती संजीव आला आणि त्याने रामवीरला पकडले. (वाचा - Haryana Shocker: व्यावसायिकाची आई आणि पत्नीसमोर केली हत्या, भयावह घटनेचा Video व्हायरल)
रागाच्या भरात राखीने रामवीरच्या कानातच्या भागाचा चावा घेतला. रामवीरने तिला जेव्हा तिला थुंकण्यास सांगितले तेव्हा तिने तो भाग गिळून घेतला. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 325 आणि 506 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. घटनेची पुष्टी करताना सहाय्यक पोलिस आयुक्त अरीब अहमद यांनी इंडिया टुडेला सांगितले की, आरोपी महिलेविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.