IPL Auction 2025 Live

7th Pay Commission Update: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार एक चांगली बातमी

केंद्र सरकारने जुलै ते डिसेंबर या कालावधीत महागाई भत्ता (DA) वाढीची घोषणा केलेली नाही.

Indian Currency | (Photo Credits: PTI)

सातव्या वेतन आयोगाच्या (Seventh Pay Commission) शिफारशीनुसार वेतन मिळवणाऱ्या केंद्र सरकारच्या (Central Government) कर्मचार्‍यांना लवकरच एक चांगली बातमी मिळू शकेल. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (Central Government employees) लवकरच एक चांगली बातमी मिळणार आहे. केंद्र सरकारने जुलै ते डिसेंबर या कालावधीत महागाई भत्ता (DA) वाढीची घोषणा केलेली नाही. या संदर्भात कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आले नसले तरी डीएच्या दरवाढी बाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. असे एका अहवालात म्हटले आहे.

येथे हे लक्षात घेतले जाऊ शकते की जानेवारी आणि जुलैमध्ये डीए दरवर्षी दोनदा वाढ केली जाते. 1 जुलैपासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगांतर्गत डीए म्हणून त्यांच्या मुलभूत पगाराच्या 28 टक्के रक्कम मिळेल. यावर्षी जानेवरीत 4 टक्क्यांनी शेवटची वाढ जाहीर केली होती. परंतु 2021 थकीत वाढ जाहीर केली नाही.

डीएच्या अहवालानुसार केंद्र सरकारलवकरच डीएमध्ये वाढ केल्याची घोषणा करू शकते. ही भाडेवार मंजूर झाल्यास कर्मचाऱ्यांना 31टक्के भाडेवाढ मिळेल. जानेवारी ते मे या कालावधीत ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार डीएमध्ये 31 टक्के भाडेवाढ अपेक्षित आहे. डीएनएने आणखी एका ताज्या अहवालानुसार एआयपीपीआय मे 2021 च्या निर्देशांकात 0.5 अंकांच्या वाढीनंतर 120.6 वर पोहोचला आहे.

कामगार मंत्रालयाने जूनचा डेटा जाहीर केलेला नाही. जूनच्या आकडेवारीत कोणतीही मोठी वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे अहवालात नमुद केलेले नाही. जूनमध्ये एआयसीपीआय 130 वर पोहोचला तर डीएमध्ये टक्के वाढ जाहीर केली जाऊ शकते. परंतु एआयसीपीआयला एका महिन्यात 10 गुणांची उडी करणे अशक्य आहे, म्हणूनच डीएमध्ये 3 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगात केलेल्या दरवाढीचे कर्मचारी वाट पाहत आहेत. आता ही भाडेवाड कर्मचाऱ्यांपर्यंत कधी पोहचणार याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे, जाहीर केलेली भाडेवाड कधी मिळणार असा प्रश्न सरकारला विचारला जात आहे. तसेच या निर्णयाबद्दल सरकारचे कौतुकही होत आहे.