Bengaluru Shocker: अज्ञात व्यक्तीकडून महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, कुत्र्यांच्या भुंकण्याने घबरून आरोपी फरार (Watch Video)
बेंगळुरूच्या कोनानकुंटे येथे एका अज्ञात व्यक्तीने राजस्थानी महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याच्या प्रयत्नात मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेवर हल्ला केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
Bengaluru Shocker: बेंगळुरूच्या कोनानकुंटे येथे एका अज्ञात व्यक्तीने राजस्थानी महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याच्या प्रयत्नात मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेवर हल्ला केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पीडित महिला मॉर्निंग वॉकसाठी घरा बाहेर आली होती. ती मैत्रीणीची वाट पाहत होती त्यावेळीस अज्ञात व्यक्ती तीच्या जवळ आला आणि तीला मारहाण करू लागला. (हेही वाचा- सोसायटीच्या बैठकीत राडा, रागाच्या भरात अध्यक्षने सदस्याच्या अंगठाच्या घेतला चावा, गुन्हा दाखल)
मिळालेल्या माहितीनुसार, महिला सकाळी ५ च्या दरम्यान घरातून बाहेर पडली. तीच्या मैत्रीणी वाट पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी राहिली. तेवढ्याच महिलेच्या जवळ एक अज्ञात व्यक्ती आला. त्याच्या अंगावर अयोग्यरित्या स्पर्श करू लागला. त्यानंतर तीने दूर पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर त्याने महिलेचा पाठलाग केला आणि तीला जवळ खेचून मारहाण करण्यास सुरुवात केली.
This trauma is engraved 🤢
Case reported from #Bengaluru’s Konanakunte police station limits. Rajasthani woman was getting ready for her 5am walk, she was waiting for a friend to join her when a man crept up & groped her… she tried to escape but he speeds up behind her, covers… pic.twitter.com/wvOtwe9056
— Nabila Jamal (@nabilajamal_) August 5, 2024
महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता. हे व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. महिलेने जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. त्यानंतर रस्त्यावरच्या कुत्र्यांनी देखील भुंकण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घाबरलेल्या पीडित तरुणीने पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी आरोपीची शोध सुरु केला. पोलिसांनी सांगितले की, कोणाला आरोपीची माहिती मिळत असेल, तर त्याने खबर द्यावी. आरोपीची ओळख पटवण्यासाठी अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. कुत्र्यांनी वेळीच भुंकू आरोपीला पळवून लावले. त्यामुळे महिलेचा जीव वाचला.
(The above story first appeared on LatestLY on Aug 05, 2024 12:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

