Asam Crime: शाळेत मित्रासोबत क्षुल्लक कारणावरून वाद; चौघांनी मिळून केली बेदम मारहाण, अल्पवयीन मुलाचा मृत्यू

शाळेच्या परिसरात मित्रांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर क्षुल्लक कारणावरून मित्राने नववीच्या विद्यार्थ्याची हत्या केली.

Photo Credit- X

Asam Crime: आसाममधील दरांग जिल्ह्यातील एका शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेच्या परिसरात मित्रांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर क्षुल्लक कारणावरून मित्राने नववीच्या विद्यार्थ्याची हत्या केली. या घटनेनंतर शाळेत एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांची चौकशी सुरु आहे. (हेही वाचा-कानपूरमध्ये 65 वर्षीय वृद्धांना 25 वर्षीय तरुण बनवण्याचे आमिष दाखवून केली 35 कोटी रुपयांची फसवणूक; गुन्हा दाखल, तपास सुरु)

मिळालेल्या माहितीनुसार, दरांग जिल्ह्यातील एका शाळेत वर्गमित्राने मित्राची हत्या केली. भाबेक डेका असं मृत मुलाचे नाव आहे. ही घटना पदुम पुखरी हायस्कूलमध्ये घडली. क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये भांडण सुरु झाले. या भांडणाचे रुपांतर मारामारीत झाले. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत भाबेकचे भांडण झाले होते. पीडितेला मारहाण करण्यासाठी त्याने आपल्या मित्रांची मदत घेतले.

चार जणांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली. लाथा बुक्कीने मारहाण केल्याने भाबेक गंभीर जखमी झाला. त्याला देवमोनोई रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्याला मंगलदाई सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना शाळेत पसरताच, एकच गोंधळ निर्माण झाला.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी चारही आरोपी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. या घटनेनंतर अनेक पालकांनी संताप व्यक्त केला असून शाळेच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक, सहा शिक्षक आणि इतर कर्मचारी यांना ताब्यात घेतले आहे. परिस्थिती हाताळण्यास शाळेचे कर्मचाऱ्यांकडून काही निष्काळजीपणा का झाला याची चौकशी करण्यात येत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif