Amul Congratulates UK PM Rishi Sunak: अमूलने खास डूडल शेअर करत केलं ब्रिटनचे नवे पंतप्रधान Rishi Sunak यांचे अभिनंदन
दुग्धजन्य पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या अमूल (Amul) ने आपल्या खास डूडलद्वारे ऋषी सुनक यांचे अभिनंदन केले आहे.
Amul Congratulates UK PM Rishi Sunak: भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनल्याने देशात आनंदाचे वातावरण आहे. ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे देश आणि जगातील अनेक बड्या व्यक्तींनी अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनीही ऋषी सुनक यांचे अभिनंदन केले. यामुळे भारत आणि ब्रिटनमधील संबंधांमध्ये नवीन अध्यायाची भर पडेल अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे, दुग्धजन्य पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या अमूल (Amul) ने आपल्या खास डूडलद्वारे ऋषी सुनक यांचे अभिनंदन केले आहे.
ऋषी सुनक या वर्षी ब्रिटनचे तिसरे पंतप्रधान बनले आणि सर्वोच्च पद भूषवणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती बनून त्यांनी इतिहास रचला. सुनक यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशाच एका अभिनंदन संदेशात, डेअरी ब्रँड अमूलने ब्रिटनच्या नवीन पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यासाठी एक मनोरंजक क्रिएटिव्ह आणला आहे. (हेही वाचा - Rishi Sunak पंतप्रधान होताच ब्रिटीश सरकारमध्ये आणखी एका भारतीयाचा प्रवेश; Suella Braverman यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन)
अमूलने दिल्या खास शुभेच्छा -
अमूलने सोशल मीडियावर एक खास डूडल शेअर केले आहे. कंपनीने आपल्या ट्विटमध्ये ऋषी सुनक यांचा फोटो खास डूडलचा फोटो शेअर केला आहे. "#Amul Topical: ब्रिटनच्या पहिल्या भारतीय वंशाच्या पंतप्रधानांचे स्वागत आहे!" असं कॅप्शन अमूलने दिलं आहे. इंस्टाग्रामवर हजारो यूजर्संनी ही पोस्ट लाईक्स केली आहे.
अमूलच्या या सर्जनशील संदेशाने वापरकर्ते खूप प्रभावित झाले आहेत. अनेक यूजर्संनी या पोस्टवर कमेन्ट केल्या आहेत. अमूल अशा खास प्रसंगांसाठी खास डूडल बनवत असते. अमूल देश आणि जगातील कोणत्याही मोठ्या इव्हेंटबद्दल किंवा क्रीडा, राजकारण आणि मनोरंजन विश्वातील कोणत्याही मोठ्या इव्हेंटबद्दल डूडल बनवत असते. अमूलचे डूडल लोकांच्या भावनांशी सहज जोडले जातात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)