Noida Girls Fight Video: दोन तरुणींची कॅन्टीनमध्ये मारामारी, नोएडा येथील एमिटी युनिव्हर्सिटीची घटना (Watch Video)
नोएडा येथील एमिटी युनिव्हर्सिटी हे नेहमीच चर्चेत असते. आता सोशल मीडियावर या युनिव्हर्सिटीच्या कॅन्टीनमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दोन मुली एकमेकांशी भांडताना दिसत आहे.
Noida Girls Fight Video: नोएडा येथील एमिटी युनिव्हर्सिटी हे नेहमीच चर्चेत असते. आता सोशल मीडियावर या युनिव्हर्सिटीच्या कॅन्टीनमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दोन मुली एकमेकांशी भांडताना दिसत आहे. दोघी मारामारी करत असल्याचा व्हिडिओत दिसत आहे. मुली एकमेकांना शिवीगाळ करत आहे. हे जोरदार भांडण पाहण्यासाठी कॅन्टीनमध्ये उपस्थित असलेल्यांनी गर्दी केली आहे. (हेही वाचा- एक वेळा नाही तर आठ वेळा कानाखाली मारली, विद्यार्थी जखमी, शिक्षक निलंबित)
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील नोएडाच्या सेक्टर १२५ मध्ये असलेल्या एमिटी युनिव्हर्सिटीच्या कॉलेज कॅन्टीनमध्ये ही घटना घडली. या तरुण मुली एकमेकांशी का भांडत आहे याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. ३० सेंकदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, दोघे एकमेकांचे शर्ट घेचत आहे. बुक्कीने मारहाण करत आहे. एकीने दुसऱ्या मुलीला खाली फेकले.
पाहा व्हिडिओ
कितनी मेहनत से पढ़ाई कर रहे हैं बच्चे आगे तो बढ़ेंगे ही, वायरल वीडियो नामी यूनिवर्सिटी बताई जा रही है ,#Amity_University की कैंटीन में दो छात्रा आपसे में भिड़ी, दोनों युवतियों के बीच हुई मारपीट,मारपीट का वीडियो सोशल मीडिया पर हुआ वायरल, नोएडा की Amity University का बताया जा रहा… pic.twitter.com/H8ZyRoHPww
— निशान्त शर्मा (भारद्वाज) (@Nishantjournali) July 23, 2024
दोघींमध्ये मारहाण सुरु असताना एक मुलगी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. कॅन्टींगमध्ये उपस्थित असलेले इतर मुले भांडण पाहण्यासाठी गर्दी करत आहे. एकाने या घटनेचा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला आणि भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुलींवर कारवाई करण्याची विनंती केली. मुलींची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहे. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.
(The above story first appeared on LatestLY on Jul 24, 2024 12:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

