Amit Shah Fake Video: अमित शाह फेक व्हिडिओ प्रकरणात मोठी कारवाई, काँग्रेस आणि आपच्या दोघांना अटक; कोण आहेत ते?
हे दोघंही काँग्रेस आणि आपशी जोडले गेले असल्याची माहिती मिळाली आहे.
Amit Shah Fake Video Case : केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा फेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सायबर क्राईम (Ahmedabad Cyber Crime) पथकाने दोन लोकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं सतीश वनसोला आणि आर बी बारिया अशी आहेत. सतीश वनसोल काँग्रेस (Congress)चे आमदार जिग्नेश मेवानी यांचे पीए आहेत. तर आर बी बारीया आम आदमी पार्टी (AAP)चे दाहोद जिल्हा प्रमुख आहेत. दोघांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. अमित शाह (Amit Shah) यांच्या दोन सभांचे व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने ए़डिट करून ते व्हायरल केले गेले होते. (हेही वाचा :Amit Shah Deepfake Video Case: महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर गुन्हा दाखल; अमित शाह यांचा बनावट व्हिडिओ केला होता शेअर )
याशिवाय, फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांकडूव तेलंगनाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, नागालँड राज्यात दिल्ली पोलिसांची वेगवेगळी पथकं तपसासाठी पाठवण्यात आली आहेत.
फेक व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीच्या लोकसभा उमेदवारालाही नोटीस पाठवण्यात आली असून त्याला तपासासाठी बोलवण्यात आले आहे. झारखंडमध्ये काँग्रेस नेत्याला नोटीस पाठवण्यात आली आहे. चौकशीसाठी या नेत्याला बोलवण्यात आलं आहे. नागालँडमध्येही एका काँग्रेस नेत्याला नोटीस पाठवण्यात आली आहे. या सर्वांना मोबाईल बरोबर घेऊन येण्यास सांगण्यात आलंय.
फेक व्हिडिओ व्हायरल होताच या प्रकरणी अमित शाह यांनी गुवाहाटीत काँग्रेकवर हल्लाबोल केला. जनतेत खोट्या बातम्या पसरवून काँग्रेसकडून दिशाभूल केला जात असल्याचा आरोप अमित शाह यांनी केला. भारतीय जनता पार्टीचा एससी, एसटी आणि ओबीसीच्या आरक्षणाला पाठिंबा आहे आणि त्याच्या संरक्षणाची भूमिका निभावेल असं अमित शाह यांनी म्हटलंय. एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणावर काँग्रेसने दरोडा टाकल्याचा आरोपही त्यांनी केला.