'मल्लिकार्जुन खर्गे यांना भारतापेक्षा इटली संस्कृतीची अधिक माहिती'; राफेल पूजेनंतर अमित शहा यांनी साधला निशाणा

राफेल ची पूजा कशाला? असा प्रश्न खडगे यांनी उपस्थित केला होता. यावर अमित शहा यांनी खडगे यांच्यावर जोरदार टिका केली आहे.

BJP National President Amit Shah | (Photo credit : Facebook)

भारताचे गृह मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी राफेलच्या (Rafael) पूजेवर प्रश्न निर्माण करणाऱ्या कॉंग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्यावर निशाणा साधला आहे. राफेल ची पूजा कशाला? असा प्रश्न खडगे यांनी उपस्थित केला होता. यावर अमित शहा यांनी खडगे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. खर्गे यांना भारतापेक्षा (India) इटली (Italy) संस्कतीची अधिक माहिती आहे, असे बोलत अमित शहा यांनी खडगे यांना खडेबोल सुनावले आहे.

भारतात राफेल दाखल होणार असल्यामुळे सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये जाऊन विमानाची पूजा केली होती. यावर मल्लिकार्जुन यांनी भाजपवर टीका करत म्हणाले होते की, "अशा प्रकारे तमाशा करण्याची गरज नाही. प्रथम, जेव्हा आम्ही बोफोर्स तोफसारखी शस्त्रे घेतली तेव्हा कोणीही गेले नव्हते आणि कोणत्या प्रकारचा दिखावा करत भारतात आणलेही नव्हते." या शब्दात खडगे यांनी भाजपवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देत अमित शहा म्हणाले की, "खर्गे म्हणाले आहेत की, राफेलची शस्त्र पूजा करण्याची काय आवश्यक होते. विजयादशमीच्या दिवशी शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आपण शस्त्रांची पूजा करावी की नाही ते सांगा? यात त्यांचा दोष नाही, त्यांना इटलीच्या संस्कृतीविषयी अधिक माहिती आहे, भारताच्या संस्कृतीच नाही" असे बोलत अमित शहा यांनी खर्गे यांच्यावर टीका केली आहे.हे देखील वाचा- Zee Yuva Sanman: भाजप पक्षाच्या Poonam Mahajan यांचा 'युवा नेतृत्व' पुरस्काराने गौरव

BJP चे ट्विट-

विधानसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांची हरियाणा येथे नुकतीच सभा पार पडली. या सभेत अमित शहा यांनी भाजप पक्षाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.