भयानक! तरुणाच्या गुप्तांगामध्ये प्रेशर पंपने भरली हवा

दिल्लीमध्ये चपलांच्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाच्या गुप्तांगामध्ये त्याच्या मित्राने प्रेशर पंपने हवा भरल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

फोटो सौजन्य - फाइल फोटो

दिल्लीमध्ये  चप्पलांच्या  फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाच्या गुप्तांगामध्ये त्याच्या मित्राने प्रेशर पंपने हवा भरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर या घटनेमधील तरुणाची स्थिती गंभीर आहे.

मियावली नगरामध्ये चप्पलांच्या फॅक्टरीत त्याचा मित्राने मस्करी करत सरबजीत या तरुणाच्या गुप्तांगामध्ये प्रेशर पंपने हवा भरली. तसेच हवा भरल्याने सरबजीत तेथेच खाली पडला. या घटनेने फॅक्टरीमधील कामगारांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

मात्र सरबजीतला गंभीर दुखापत झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.