Ganpati Visarjan: गणपती विसर्जन झाल्यानंतर नागरिकांनी घेतला मुर्तीचा शोध, 10 तासांनंतर अखेर सापडली 'ती' गोष्ट
गणपती बाप्पाचे आगमन होऊन पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन देखील झाले आहे. पाच दिवसाच्या सार्वजनिक आणि घरगुती गणपतीचे विसर्जन झाल्याचा उत्साह पाहायला मिळत आहे.
Ganpati Visarjan: देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह जोरदार साजरा केला जात आहे. गणपती बाप्पाचे आगमन होऊन पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन देखील झाले आहे. पाच दिवसाच्या सार्वजनिक आणि घरगुती गणपतीचे विसर्जन झाल्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. पण कर्नाटकातील बेंगळुरु येथे मूर्ती विसर्जनादरम्यान अशी एका घटना घडली ज्यामुळे नागरिकांना 10 तासांचा शोध काम करावे लागले. (हेही वाचा- कार्टर रोड समुद्रामध्ये बुडणाऱ्या दोन व्यक्तीचे प्राण वाचवण्यास मुंबई पोलिसांना यश)
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील बेंगळुरु येथील एका कुटुंबाने मूर्ती विसर्जन करण्यापूर्वी गणपतीच्या गळ्यात सोन्याची चैन घातली होती. परंतु विसर्जसानाच्या वेळी ती सोनसाखळी काढालया विसले आणि मूर्तीचे विसर्जन केले. मूर्ती विसर्जन केल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना आठवले की सोन साखळी मूर्ती सोबत विसर्जित झाली आहे. ही सोन साखळी 4 लाख रुपयाच्या किंमतीची 60 ग्रॅमची आहे.
रमैय्या आणि उमादेवी यांनी त्यांच्या घरी गणपती मूर्ती बसवली होती. हे विजयनगर येथील दसराहल्ली भागातील रहिवासी आहे. त्यांनी पाच दिवसांनंतर गणपतीचे विसर्जन केले. गणपतीला फुलांच्या माळांनी सजवले होते. त्यावेळी मूर्तीच्या गळ्यात सोन्याची चैन देखील होती. गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर कुटुंबियांना लक्षात आले की, मूर्तीसोबत सोन्याची चैन पाण्यात विसर्जित झाली. कुटुंबियांनी गावकऱ्यांची मदत घेत सोनसाखळीचा शोध घेतला.
काही लोकांनी सांगितले की, विसर्जनाच्या वेळी त्यांना गणपतीच्या गळ्यात साखळी दिसली होती पण ती त्यांना बनावट असावी असं वाटले. यानंतर दाम्पत्याने मगडी रोड पोलस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांसह तेथील उपस्थित लोकांनी दाम्पत्यांची मदत केली. साखळी शोधण्यासाठी 12 जणांना बोलावण्यात आले. टाकीतले 10 लीटर पाणी बाहेर काढण्यात आले. परंतु पाण्यात चैन काही सापडणे. अखेर 10 तासानंतर चिखलाच्या दलदलीत साखळी सापडली.