UP Election 2022 Result: उत्तर प्रदेशमधील भाजपच्या विजयानंतर कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे चढल्या बुलडोझरवर; Watch Viral Video
कानपूर आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या विजयाने आनंदित झालेल्या महापौर प्रमिला पांडे यांनी समर्थकांमध्ये बुलडोझरवर चढून भाजपच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
UP Election 2022 Result: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा बहुमताने विजयी झाले आहे. यासोबतचं योगी आदित्यनाथ यांनी 4 दशकांनंतर सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येण्याचा इतिहासही रचला आहे. भाजपच्या विजयाने सर्वच नेते व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. दरम्यान, नेहमी चर्चेत असणार्या कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे (Pramila Pandey) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या जेसीबीवर चढलेले दिसत आहेत.
कानपूर आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या विजयाने आनंदित झालेल्या महापौर प्रमिला पांडे यांनी समर्थकांमध्ये बुलडोझरवर चढून भाजपच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. यावेळी महापौर म्हणाल्या, आता पुढील 5 वर्षे यूपीमध्ये कायद्याचे राज्य राहणार असून गुंड आणि माफियांच्या घरांवर बुलडोझर चालणार आहे. महापौरांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (वाचा - Assembly Election Results 2022 Live News Updates: लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन भाजपचा विजय सुनिश्चित केल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार - पंतप्रधान नरेंद्र मोदी)
उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यादरम्यान, कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे यांच्यावर मतदानाची गोपनीयता भंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर डीएमने एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते. मतदानादरम्यान ईव्हीएममध्ये मतदान करताना त्यांनी त्यांचा फोटो सार्वजनिक केल्याचा आरोप महापौर पांडे यांच्यावर करण्यात आला होता. फोटोमध्ये त्या एका पार्टीला मतदान करताना दिसत होत्या.
रिव्हॉल्व्हरही दीदींच्या नावानेही प्रसिद्ध -
प्रमिला पांडे या त्यांच्या दबंग शैलीसाठीही ओळखल्या जातात. प्रमिला पांडे कानपूरच्या लोकांमध्ये रिव्हॉल्व्हर दीदी आणि रिव्हॉल्व्हर अम्मा म्हणून प्रसिद्ध आहेत. महापौर होण्यापूर्वी त्या नगरसेवक होत्या आणि त्या काळात प्रमिला पांडे लायसन्स असलेले रिव्हॉल्व्हर घेऊन जीपमध्ये फिरत होत्या. प्रमिला पांडे या भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षही राहिल्या आहेत.