Telugu Actor Chandu Suicide: गर्लफेंडच्या अपघाती मृत्यूनंतर तेलुगु अभिनेता चंदूची आत्महत्या, राहत्या घरात घेतला गळफास
चंदूची मैत्रिण आणि त्याची सहकलाकार पवित्रा जयराम हीच्या कार अपघातात मृत्यू झाल्याने पाच दिवसांनतर चंदूने आत्महत्या केले.
Telugu Actor Chandu Suicide: तेलुगु टेलिव्हीजन अभिनेता चंदू (Actor Chandu) याने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंदूची मैत्रिण आणि त्याची सहकलाकार पवित्रा जयराम हीच्या कार अपघातात मृत्यू झाल्याने पाच दिवसांनतर चंदूने आत्महत्या केले. मीडिया रिपोर्टनुसार, चंदू मणिकोंडा येथील त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला आहे. चंदूच्या आत्महत्यानंतर तेलुगु टीव्ही मालिकेत शोककळा पसरली आहे. (हेही वाचा- पतीच्या मित्राने मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन केले मॉडेलवर बलात्कार
मिळालेल्या माहितीनुसार, पवित्रा जयराम हीच्या निधनानंतर चंदू उदास होता. त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे असा संशय व्यक्त केला जात आहे. वारंवार फोन करून कोणाचा फोन न उचलल्याने कुटुंबाने त्याच्या खोलीचा दरवाजा तोडला. त्यावेळीस चंदू लटकलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यावेळीस तपासणी चंदूच्या खोलीत सुसाईड नोटही सापडली. या घटनेनंतर चंदूच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
चंदू आणि पवित्रा रिलेशनशिपमध्ये असल्याचं अनेक मीडिया रिपोर्टकडून माहिती मिळत आहे. दोन्ही कलाकार विवाहित होते पण ते दोघे ही जोडीदारांपासून विभक्त झाले. पवित्रा सहलीला गेली होती परतीच्या प्रवास जीवघेणा ठरला. पाच दिवसांपूर्वी रविवारी (१२ मे) आंध्र प्रदेशातील महबूबनगरजवळ तीचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना चंदूला सहन झाली नाही त्यामुळे त्याने आत्महत्या केली. चंदूच्या आत्महत्याचे नेमके कारण पोलिस शोधत आहे. चंदूच्या चाहत्यांनी या घटनेनंतर दुख व्यक्त केले आहे.