IAS Officer in Controversy: पूजा खेडकर यांच्यानंतर आता आणखी एक IAS अधिकारी वादात; UPSC मधील अपंग कोट्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर सोशल मीडियावर टीका
मग या महत्त्वाच्या सेवेत अपंग कोट्याची गरजच काय? असा सवाल सभरवाल यांनी केला आहे.
IAS Officer in Controversy: वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राज्यात सर्वत्र या कुटुंबाच्या चर्चा सुरू आहेत. पूजा खेडकर यांच्यावर बनावट अपंगत्व प्रमाणपत्र देऊन या कोट्या अंतर्गत पद मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, आता तेलंगणा वित्त आयोगाच्या सदस्याने नागरी सेवांमध्ये अपंगत्व कोट्याच्या आवश्यकतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. तेलंगणा वित्त आयोगाच्या सदस्य आणि वरिष्ठ आयएएस अधिकारी स्मिता सभरवाल (Smita Sabharwal) यांनी म्हटलं आहे की, तळागाळात काम केल्यामुळे दिव्यांगांना आयएएस, आयपीएस सारख्या प्रतिष्ठित सेवांमध्ये काम करताना अडचणी येतात. दिव्यांगांबद्दल मला पूर्ण आदर आहे, पण कोणतीही विमान कंपनी अपंग वैमानिकांना कामावर घेते का? तसेच तुम्ही एखाद्या दिव्यांग सर्जनवर विश्वास ठेवाल का? असा प्रश्नही स्मिता सभरवाल यांनी केला आहे. (हेही वाचा - Pistol Seized from Manorama Khedkar's Residence: मनोरमा खेडकर यांच्या पुण्यातील राहत्या घरातून पिस्तूल जप्त; शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकवल्याप्रकरणी करण्यात आली कारवाई)
दिव्यांगांना नागरी सेवांमध्ये आरक्षणाची गरज काय?
स्मिता सभरवाल यांनी पुढे आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, AIS (IAS/IPS/IFoS) चे स्वरूप फील्ड-वर्क, दीर्घ कामाचे तास, लोकांच्या तक्रारी थेट ऐकणे आदीसाठी शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक आहे. मग या महत्त्वाच्या सेवेत अपंग कोट्याची गरजच काय? असा सवाल सभरवाल यांनी केला आहे. मात्र, स्मिता सभरवाल यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका केली जात आहे. (हेही वाचा - Manorama Khedkar Police Custody: पूजा खेडकरची आई मनोरमा यांच्या पोलीस कोठडीत वाढ)
स्मिता सभरवाल यांचे ट्विट -
ही दयनीय आणि बहिष्कृत वृत्ती आहे - प्रियांका चतुर्वेदी
स्मिता सभरवाल यांच्या पोस्टवर लोकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. तसेच अनेकांनी त्यांच्या पोस्टला अनभिज्ञ म्हटले आहे. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे की, 'ही अत्यंत दयनीय आणि बहिष्कृत वृत्ती आहे. नोकरशहा त्यांची मर्यादित मते आणि विशेषाधिकार कसे दाखवतात, हे पाहणे मनोरंजक आहे.'