Up Shocker: घरात शिरून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी भंगारवाल्याचे दुकान संतप्त जमावाने पेटवले

परिसरात वीज खंडित असताना काळोखाचा फायदा घेत मुलीच्या घराता घुसून बलात्कार केला.

UP Shocker Photo Credit X

Up Shocker: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. परिसरात वीज खंडित असताना काळोखाचा फायदा घेत मुलीच्या घराता घुसून बलात्कार केला. आरोपी पीडितेच्या घराच्या शेजारीच राहतो. या घटनेनंतर आरोपीविरुध्दात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला. आरोपी परिसरात भंगार विक्रेता म्हणून काम करतो. (हेही वाचा-चुकीचा स्पर्श, जबरदस्ती चुंबन, वसई येथे 14 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकास ग्रामस्थांचा चोप; पोलिसांकडून अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबाद येथे बुधवारी सांयकाळी वीज खंडित झाली होती. त्यावेळी काळोख्याचा फायदा घेत शेजारीच राहणाऱ्या एका तरुणाने १४ वर्षाच्या मुलीच्या घरात घूसून तीच्यावर बलात्कार केला. पीडितेने पोलिसांना सांगितले की, घरी कोणी नसताना, ३ ते ४ जण मागच्या बाजूच्या दरवाज्याने घरात घुसले आणि बलात्कार केला.  या घटनेची माहिती परिसरात पसरताच, स्थानिकांनी संताप व्यक्त केला.

स्थानिकांनी रात्रीच्या वेळीस रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. कुटुंबियानी पोलिस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीचा शोध सुरु केला. पोलिसांनी आरोपी अटक केले आहे. संतप्त नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरु ठेवली आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

आरोपीला अटक 

या घटनेचा निषेध करत आरोपीचे भंगाराच्या दुकानाला आग लावली. त्यांच्या दुकानातील अनेक वस्तूंचे नुकसान केले. आग लावण्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिस जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif