Aftab Killed Shraddha: आफताबने केली गर्लफ्रेंड श्रद्धाची हत्या; मृतदेहाचे 35 तुकडे करून दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी फेकले, 6 महिन्यांनंतर झाला खुलासा

यानंतर आफताबने चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले. तब्बल सहा महिन्यांनंतर आरोपी आफताबला अटक करण्यात आली आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

Aftab killed Shraddha: दक्षिण दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आफताब (Aftab) अमीन पूनावाला नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. ज्याने आपली मैत्रिणी श्रद्धाची हत्या (Shraddha Murder Case) केली, नंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि नंतर ते संपूर्ण दिल्लीत फेकले. त्याचवेळी आफताबच्या चौकशीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांचा शोध सुरू केला आहे. आफताबचा बळी ठरलेली श्रद्धा मुंबईतील कॉल सेंटरमध्ये काम करत होती.

चौकशीदरम्यान आफताबने दिल्ली पोलिसांना सांगितले की, लिव्ह-इनमध्ये असताना श्रद्धा नेहमी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत असे. यावरून त्यांच्यात अनेकदा भांडणे होत होती. यानंतर हत्येचे पूर्ण नियोजन करून आफताबने श्रद्धाला लग्नाच्या बहाण्याने दिल्लीत आणले. दिल्लीतील छतरपूर भागात भाड्याच्या घरात राहू लागला. 18 मे रोजीही लग्नावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. दरम्यान, आफताबचा संयम सुटला आणि त्याने श्रद्धाचा गळा आवळून खून केला. (हेही वाचा - MP Shocker: मानवतेला काळीमा! 78 वर्षीय वृद्ध महिलेवर 37 वर्षीय पुरुषाचा बलात्कार; आरोपीला अटक)

18 मे रोजी करण्यात आली श्रद्धाची हत्या -

दरम्यान, 18 मे रोजी श्रद्धाची गळा आवळून हत्या केल्यानंतर आफताबने तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले. यानंतर दिल्लीतील अनेक भागात त्याने हे तुकडे फेकले. त्याचवेळी वडील विकास मदन वॉकर यांनी सांगितले की, अनेक महिन्यांपासून ते त्यांची मुलगी श्रद्धाशी संपर्क करू शकत नव्हते. यानंतर 8 नोव्हेंबर रोजी ते दिल्लीतील छतरपूर येथील फ्लॅटवर आले. त्यांना श्रद्धा येथे भाड्याने राहत असल्याचे समजले. याची माहितीही त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली. येथे त्यांना श्रद्धाच्या खोलीला कुलूप लावल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी मेहरौली पोलीस ठाणे गाठून श्रद्धाच्या अपहरणाची माहिती पोलिसांना दिली. यानंतर दिल्ली पोलिसांनी तपासानंतर संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. सध्या आरोपी आफताब दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे.

हत्येनंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करून दिल्लीच्या विविध भागात फेकून देण्याचा आफताबचा प्लान होता. पोलिसांची दिशाभूल करणे हा आफताबचा उद्देश होता. त्याचवेळी दिल्ली पोलिस श्रद्धाचा मृतदेह कधीच मिळवू शकणार नाहीत आणि तो हत्येतून निसटून जाईल असा त्याला विश्वास होता. दुसरीकडे, सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या हत्येचा दिल्ली पोलिसांनी बऱ्याच प्रयत्नांनंतर खुलासा केला आहे.

आरोपीवर श्रद्धाचा लग्नासाठी दबाव -

दिल्ली पोलिसांच्या या खुलाशानंतर श्रद्धाच्या कुटुंबीयांसह सामान्य लोकही आश्चर्यचकित झाले आहेत, कारण आफताब आणि श्रद्धा दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. मुंबईतील कॉल सेंटरमध्ये काम करणारी श्रद्धा लिव्ह-इनमध्ये राहायची आणि आफताबवर तिचे खूप प्रेम होते. श्रध्दा आफताबवर लग्नासाठी सतत दबाव टाकत होती. यामुळे नाराज झालेल्या आफताबने दिल्लीत श्रद्धाला ठार मारण्याचा कट रचला. श्रद्धा मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती. यादरम्यान तिची आफताबशी भेट झाली. काही भेटीनंतर श्रद्धा आणि आफताब एकमेकांवर प्रेम करू लागले. दरम्यान, दोघेही फ्लॅट घेऊन लिव्ह इनमध्ये एकत्र राहू लागले.

आफताबने हत्येच्या बहाण्याने श्रद्धाला मुंबईहून दिल्लीत आणले -

मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धाने लग्नासाठी आफताबवर दबाव टाकला. त्यामुळे आफताबने तिच्या हत्येचा कट रचला. आफताबने लग्नाच्या बहाण्याने श्रद्धाला दिल्लीला आणले. येथे ते दोघे सोबत राहत होते. यानंतर एके दिवशी श्रद्धाचा जागीच मृत्यू झाला आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले. पोलिसांपासून वाचण्यासाठी आणि पुरावे लपवण्यासाठी श्रद्धाच्या शरीराचे अवयव दिल्लीतील अनेक भागात फेकण्यात आले होते.

वडिलांनी नोव्हेंबरमध्ये केली श्रद्धाच्या अपहरणाची तक्रार -

वडील विकास मदन वॉकर यांनाही त्यांची मुलगी श्रद्धाच्या हत्येबाबत माहिती नव्हती. अनेक महिन्यांपासून ते आपल्या मुलीशी संपर्क साधू शकले नाही, म्हणून 8 नोव्हेंबर रोजी त्यांनी मुलगी श्रद्धाच्या अपहरणप्रकरणी दिल्लीतील मेहरौली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला.

दिल्ली पोलिसांनी आफताबला अपहरणाचा आरोपी मानून तपास सुरू केला. तपासात दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांची मदत घेतली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवारी तांत्रिक पाळत ठेवून आफताबचा शोध लागला. यानंतर आफताबने चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले. तब्बल सहा महिन्यांनंतर आरोपी आफताबला अटक करण्यात आली आहे.