African Swine Fever in Karnataka: कर्नाटकातील डुकरांमध्ये आढळला आफ्रिकन स्वाइन फ्लू; प्रशासन सतर्क, विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरू

अधिका-याने सांगितले की रोगाचा प्रसार रोखण्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक पावले उचलली जातील.

Pigs | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

African Swine Fever in Karnataka: कर्नाटकातील (Karnataka) दक्षिण कन्नड जिल्ह्यातील केल्लराई येथे डुकरांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. आफ्रिकन स्वाइन फिव्हर (African Swine Fever) चे हे प्रकरण एका डुक्कर प्रजनन केंद्रात आढळून आले आहे. अधिका-याने सांगितले की रोगाचा प्रसार रोखण्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक पावले उचलली जातील.

या प्रजनन केंद्राची एक किलोमीटर त्रिज्या रोगग्रस्त क्षेत्र आणि 10 किलोमीटर त्रिज्या इशारा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याचे जिल्हा पशुधन रोग व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपायुक्त यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, संसर्ग झालेल्या डुकरांना शास्त्रोक्त पद्धतीने मारून त्या ठिकाणी कीटकनाशकाची फवारणी करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. त्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये यासाठी नेमप्लेट लावण्यात येणार आहे. (हेही वाचा - Cyrus Mistry Accident Case: डॉक्टर Anahita Pandole यांच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी FIR दाखल)

दक्षिण कन्नडचे उपायुक्त एमआर रविकुमार यांनी सांगितले की, लोकांना घाबरण्याची गरज नाही कारण हा संसर्ग मानव किंवा इतर प्राण्यांमध्ये पसरत नाही. डुकराचे मांस नीट शिजवलेले असेल तर ते खाण्यास काहीच हरकत नाही. स्वाइन फ्लूचा उद्रेक H1N1 म्हणूनही ओळखला जातो. जून 2009 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याला महामारी घोषित केले. आता तो अनेक देशांमध्ये पसरला आहे.

स्वाइन फ्लूची लक्षणे - 

स्वाइन फ्लू हा देखील एक जीवाणूजन्य संसर्ग आहे जो एकमेकांपासून पसरतो. भारतात स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळवण्यात आले असले तरी, तरीही आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ताप, खोकला येणे, घसा खवखवणे, नाकातून पाणी येणे, शरीरात वेदना जाणवणे, चक्कर येणे तसेच अतिसार आणि उलट्या ही स्वाइन फ्लूची लक्षणं आहेत.