Cyrus Mistry Accident Case: डॉक्टर Anahita Pandole यांच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी FIR दाखल

डॉक्टर पांडोळे यांच्यावर भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्यान्वये निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे (Rash Driving) मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Cyrus Mistry Accident Case: डॉक्टर Anahita Pandole यांच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी FIR दाखल
Cyrus Mistry | File image)

Cyrus Mistry Accident Case: यावर्षी सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात झालेल्या कार अपघातात व्यापारी सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनाहिता पांडोळे (Dr Anahita Pandole) यांच्याविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला. कारच्या डेटा चिपचे विश्लेषण, मर्सिडीज बेंझचा अंतिम अहवाल आणि पांडोळे यांचे पती डॅरियस पांडोळे यांच्या जबानीच्या आधारे पालघर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

डॉक्टर पांडोळे यांच्यावर भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्यान्वये निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे (Rash Driving) मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडोळे, दारियस आणि मिस्त्री गुजरातहून मुंबईला जात असताना पालघरमधील सूर्या नदीच्या पुलावर कारला अपघात झाला. या अपघातात मिस्त्री आणि त्यांचे मित्र डेरियस यांचा भाऊ जहांगीर पांडोळे यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Cyrus Mistry Accident Reason: सायरस मिस्त्री यांच्या अपघातामागील कारण आलं समोर; कार चालवणाऱ्या महिला डॉक्टरच्या पतीने सांगितला 'तो' प्रसंग)

डॉ. पांडोळे यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर डॅरियस यांना या आठवड्याच्या सुरुवातीला डिस्चार्ज देण्यात आला होता. डॅरियसने मंगळवारी त्याच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानी पोलिसांसमोर जबाब नोंदवला. डॅरियस पांडोळे यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांची पत्नी डॉ. अनाहिता मर्सिडीज बेंझ कार तिसर्‍या लेनमधून चालवत होत्या. पालघरमधील सूर्या नदीच्या पुलावर रस्ता अरुंद झाल्याने कार तिसर्‍या लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये जाऊ शकली नाही.

त्यांनी सांगितले की, जेव्हा तिने कार तिसऱ्या लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला उजवीकडे (दुसऱ्या लेनमध्ये) एक ट्रक दिसला. ज्यामुळे ती दुसऱ्या लेनमध्ये कार हलवू शकली नाही. ते म्हणाले, सूर्या नदीच्या पुलावर हा रस्ता अरुंद होतो. त्यानंतर हा अपघात झाला. पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, पोलिसांनी डॅरियस पांडोळेचा जबाब नोंदवला आहे. मात्र, त्यांची पत्नी अनाहिता पांडोळे अद्याप रुग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने त्यांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही.

(The above story first appeared on LatestLY on Nov 05, 2022 07:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).