Covid-19 BF.7 Variant: कोरोनाच्या नव्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर IMA ने जारी केली अॅडव्हायजरी; देशवासियांना दिला 'हा' सल्ला
गुरुवारी रात्री उशिरा जारी करण्यात आलेल्या या अॅडव्हायझरीमध्ये लोकांना लग्न, राजकीय किंवा सामाजिक सभा तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास (International Travel) यासारखे सार्वजनिक मेळावे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Covid-19 BF.7 Variant: चीन (China) मध्ये पुन्हा एकदा कोरोनाची अनियंत्रित स्थिती आणि इतर देशांमध्ये त्याचे वाढते प्रमाण पाहता केंद्र सरकारने (Central Government) भारतातही अलर्ट जारी केला आहे. सरकारने यासंदर्भात गुरुवारी बैठक घेऊन लोकांना आवश्यक कोरोना मार्गदर्शक तत्वे (Corona Guidelines) पाळण्याचे आवाहन केले होते. यात केंद्राने राज्य सरकारांना पुढील रणनीती देखील सांगितली आहे. तर दुसरीकडे आता इंडियन मेडिकल असोसिएशन (Indian Medical Association) ने देखील देशातील नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत.
गुरुवारी रात्री उशिरा जारी करण्यात आलेल्या या अॅडव्हायझरीमध्ये लोकांना लग्न, राजकीय किंवा सामाजिक सभा तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास (International Travel) यासारखे सार्वजनिक मेळावे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लोकांना सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (हेही वाचा - Guidelines for International Arrivals: केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी जारी केले मार्गदर्शक तत्वे; 24 डिसेंबरपासून प्रवाशांची कोविड रॅन्डम चाचणी घेण्यात येणार)
विमानतळांवरही रॅन्डम चाचणीची तयारी -
परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Union Health Secretary Rajesh Bhushan) यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. यामध्ये मंत्रालयाला यादृच्छिक चाचणीसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत. आरोग्य सचिवांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत की, विमानातील एकूण प्रवाशांपैकी 2 टक्के प्रवाशांचे यादृच्छिक नमुने कोविडच्या तपासणीसाठी जातील याची खात्री करावी लागेल. पॉझिटिव्ह सॅम्पल टेस्टिंग असलेले नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जातील. (हेही वाचा - PM Narendra Modi on Covid19: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उच्चस्तरीय बैठकीत कोरोना स्थितीचा आढावा; मास्क, चाचणी आणि Precaution Dose वर दिला जाणार भर)
याशिवाय, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परदेश प्रवासापूर्वी 72 तास आधी केलेल्या RT-PCR चाचणीचा तपशील देण्यासाठी किंवा चीन आणि इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी संपूर्ण लसीकरणाचा पुरावा देण्यासाठी 'हवाई सुविधा' फॉर्ममध्ये सुधारणा केली आहे.