Delhi Flood: दिल्लीतील खासगी केंद्रांना घरून काम करण्याचा सल्ला; कश्मिरे गेटच्या आसपासचे व्यावसायिक संस्था रविवारपर्यंत बंद
दिल्ली यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढली असल्यामुळे आजूबाजूच्या भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे.
Delhi Flood: देशाची राजधानी दिल्लीत पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. यमुना नदीच्या पाण्याची पातळीत वाढ झालेली आहे. यमुना नदीच्या आसपासच्या गावात पुरपरिस्थितीचे चित्र पाहायला मिळत आहे. अख्ख गावच्या गाव पाण्याच्या खाली गेल्याचे दिसून येत आहे. दरम्यान सरकारने वेळीच सखल भागातील शाळेला सुट्टीचे आदेश दिले आहे. सोबत ज्या खासगी कंपनींना घरातून काम करण्याचा सल्ला दिला आहे. कश्मिरे गेटच्या आसपासचे व्यावसायिक संस्था रविवारपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
पुरग्रस्त परिस्थितीमुळे नागरिकांचे हाल बेहाल झालेले पाहायल मिळत आहे. सरकारने काही यंत्रणा सज्ज केल्या आहेत ज्यामुळे नागरिकांना पुरग्रस्त परिस्थितीतून बाहेर काढण्यातून मदत होईल. एनडीआरएफ जवानांकडून अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सरकारने खासगी कंपनीना कामासाठी घरातून बाहेर पडू नका, घरातून काम करण्याचे आदेश दिले आहे.
कश्मिरगेटच्या परिसरात पुरग्रस्त परिस्थितीत नागरिक अडकले आहेत. गाड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या असून अनेक घरे, इमारती, दुकाने, रस्ते वाहून गेले आहेत. PTI ने या संदर्भात पोस्ट शेअर केला आहे. वीजेच्या खांबापासून लांब रहा, असा आदेश दिल्ली सरकारने दिला आहे.