NIA Raid In Kerala: टेरर फंडिंग प्रकरणात PFI वर कारवाई; NIA ने केरळमध्ये 56 ठिकाणी टाकले छापे

केरळमधील एर्नाकुलममध्ये प्रतिबंधित पीएफआय नेत्यांशी संबंधित 8 ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे.

NIA Raid In Kerala (PC - ANI/ Twitter)

NIA Raid In Kerala: राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) देशातील बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या नेत्यांच्या 58 ठिकाणांवर छापे टाकले. केरळमध्ये अनेक ठिकाणी हे छापे सुरू आहेत. एनआयएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयचे नेते वेगळ्या नावाने PFI ची स्थापना करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एनआयएचे छापे पहाटे 4 वाजता सुरू झाले आणि ते अजूनही सुरू आहेत. केरळमधील एर्नाकुलममध्ये प्रतिबंधित पीएफआय नेत्यांशी संबंधित 8 ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. तिरुवनंतपुरममध्ये 6 ठिकाणी छापेमारी सुरू आहे. याशिवाय त्रिवेंद्रम पुरमसह अनेक ठिकाणी एनआयएचे पथक कारवाईत गुंतले आहेत. (हेही वाचा - Maharashtra Government कडून PFI आणि त्याच्या सहयोगी संस्था किंवा मोर्चांना बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करणारा आदेश केला जारी)

PFI ची स्थापना केरळमध्ये 2006 मध्ये झाली होती. ज्याने 2009 मध्ये सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या राजकीय आघाडीची स्थापना केली होती. केरळमध्ये स्थापन झालेल्या कट्टरतावादी संघटनेने हळूहळू देशाच्या विविध भागात आपले तळ पसरवले. (वाचा - PFI Banned: केंद्र सरकारच्या PFI वरील बंदीप्रमाणे महाराष्ट्रातही कारवाईचे आदेश; पहा मुख्यमंत्री, उप्मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रिया (Watch Video))

पीएफआय सदस्यांच्या संपानंतर या बंदीनंतर राज्यभरात व्यापक हिंसाचार झाला. त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने राज्य सरकारला या प्रकरणातील अधिकारी आणि आरोपींकडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान वसूल करण्याचे निर्देश दिले.