Accident Video: दुचाकीवरून जाताना निलगायीने दिली धडक, तरुणाचा मृत्यू, घटनेचा Video समोर
इनायत नगर ठाण्याच्या हद्दीतील मिठे गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे.
Accident Video: उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे निलगायीच्या धडकते अपघात घडून आला आहे. इनायत नगर ठाण्याच्या हद्दीतील मिठे गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाला आहे. रस्ता ओलांडणाऱ्या निलगायीची धडक लागल्याने अपघात घडून आला. या अपघातात 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच गोंधळ निर्माण झाला होता. (हेही वाचा- छत्रपती संभाजीनगर येथे सिलिंडरचा भीषण स्फोट, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मिठे गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर झाला. तरुण दुचाकीवरून जात होता. दरम्यान दुसऱ्या रस्त्यावरून निलगाय वेगात धावत आली. दरम्यान दोघांमध्ये जोरात धडक झाल्याने दुचाकीसह तरुणी थेट रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडला. यात त्याला गंभीर दुखापत झाली. निलगायीच्या शिंगांनी तरुणाच्या छातीला भोक पडला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मुकेश पांडे असं मृत तरुणाचे नाव आहे. तो विजयी पाठक या गावातील रहिवासी होता. अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मुकेशच्या पाश्चत पाच वर्षाची मुलगी आणि तिची पत्नी आहे.या अपघाताची माहिती कुटुंबियांना देण्यात आली. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.