Bengaluru Koramangala PG Murder Video: बिहारमधून बेंगळुरूमध्ये कामासाठी आलेल्या तरुणीची पीजी हॉस्टेलमध्ये निर्घृण हत्या; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
काही सेकंदांनंतर पीडित मुलगी आणि आरोपी पुन्हा फ्रेममध्ये दिसतात. पीडित मुलगी आरोपीच्या तावडीतून सुटण्यासाठी आक्रोश करताना दिसत आहे. वृत्तानुसार, हल्लेखोर हा तरुणीच्या ओळखीचा कोणीतरी असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.
Bengaluru Koramangala PG Murder Video: बेंगळुरू (Bengaluru) च्या कोरमंगला (Koramangala) येथे पेइंग गेस्ट (PG) निवासस्थानी राहणाऱ्या बिहार (Bihar) मधील 22 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ समोर आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री 11.10 च्या दरम्यान घडली. एका अज्ञात व्यक्तीने चाकू घेऊन पीजीमध्ये प्रवेश केला. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी हातात पिशवी घेऊन येताना आणि पीडितेचा दरवाजा ठोठावताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये आरोपी दरवाजा उघडून खोलीत शिरला. काही सेकंदांनंतर पीडित मुलगी आणि आरोपी पुन्हा फ्रेममध्ये दिसतात. पीडित मुलगी आरोपीच्या तावडीतून सुटण्यासाठी आक्रोश करताना दिसत आहे. वृत्तानुसार, हल्लेखोर हा तरुणीच्या ओळखीचा कोणीतरी असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी कोरमंगळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा -Acid Attack on Wife in Mumbai: घटस्फोट मागणाऱ्या पत्नीवर पतीने फेकलं ॲसिड; महिलेसह 12 वर्षांचा मुलगा जखमी, आरोपीला अटक)
पहा व्हिडिओ -
कृती कुमारी असे पीडित तरुणीचे नाव असून ती एका खासगी कंपनीत काम करत होती. कृती कोरमंगला येथील व्हीआर लेआउटमध्ये राहात होती. या जीवघेण्या घटनेची माहिती मिळताच कोरमंगळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. या निर्घृण हत्येला 48 तासांहून अधिक काळ लोटला असला तरी अद्याप आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. (हेही वाचा - Kolkata Suicide Case: मेट्रो रेल्वे समोर उडी मारून तरुणाचा आत्महत्याचा प्रयत्न, कोलकत्ता येथील घटना)
तथारी, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांना मुलीच्या ओळखीच्या कोणीतरी तिचा खून केल्याचा संशय आहे. डीसीपी सारा फातिमा यांनी सांगितले की, एका आरोपीने मुलीच्या वसतिगृहात घुसून तिचा गळा चिरला. या घटनेनंतर मुलीचा जागीच मृत्यू झाला. तरुणीच्या हत्येमागील कारणाचा पोलीस तपास करत आहेत. आरोपीची ओळख पटली आहे. आता त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.