Madhya Pradesh Accident: केळीने भरलेला ट्रक पुलावरून घसरला, अपघातात क्लीनर आणि चालकाचा मृत्यू
या भीषण अपघातात ट्रक चालक आणि क्लिनचा मृत्यू झाला. हा आग्रा- मुंबई महामार्गवरून उत्तर प्रदेशाकडे जात होता.
Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशातील देवासजवळ शनिवारी केळीने भरलेला ट्रक टोंककलन गावात पुलावरून घसला. या भीषण अपघातात ट्रक चालक आणि क्लिनचा मृत्यू झाला. हा आग्रा- मुंबई महामार्गवरून उत्तर प्रदेशाकडे जात होता. ट्रक अनियंत्रित होऊन धडकली. या धडकेत ट्रकचे भाग आणि चाके वेगळी झाली. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून तपास सुरु केला. (हेही वाचा- मुलांच्या जीवाशी खेळ, स्कूल व्हॅनने तोडला ट्रॅफिक सिग्नल, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शनिवारी सकाळी ७च्या सुमारास झाला. अपघात इतका भीषण होता की, ट्रकचे भाग हे वेगळे झाले. रस्त्यावर चाके विखुरळे होते. या अपघातात उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील रहिवासी अमजद आणि सिराज या दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांना माहिती मिळाली की, ट्रक वेगात होता त्याचे नियंत्रण सुटले आणि पुलावरून खाली पडला.
अपघातामुळे रस्त्यावर गर्दी जमली होती. काही काळ वाहतुक सेवा ठप्प झाली होती. ट्रक केळी घेऊन जात होता. ही केळी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये उतरवली जाणार होती. अपघातात ट्रक अरक्षश: चक्काचूर झाला आहे. ट्रग वेगवान असल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमित वृत्तात आहे. अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले होते त्यावेळीस त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारात क्लीनर आणि चालक यांचा मृत्यू झाला.