Rajasthan Road Accident: राजस्थानमध्ये कारचा भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू
एका अज्ञात वाहनाच्या धडकेत कारचा अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Rajasthan Road Accident: राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. एका अज्ञात वाहनाच्या धडकेत कारचा अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे जण जखमी झाले आहेत. हा अपघात दिल्ली- मुंबई द्रुतगती मार्गावर झाला आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या कारचा अपघात झाला. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा- अज्ञात वाहनाच्या धडकेत कारचा भीषण अपघात, तीन दगावले)
मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब सवाई माधोपूर येथील गणेश मंदिरात प्रार्थनासाठी कारने गेले होते. अज्ञात वाहनाच्या धडकेत कारचा भीषण अपघात झाला. अपघातावेळी कारमध्ये 8 प्रवाशी प्रवास करत होते. अज्ञात वाहनाच्या धडकेत कारचा चक्काचूर झाला. कारमधील 6[Poll ID="null" title="undefined"] जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावर वाहतुकसेवा विस्कळीत झाली आहे. अपघातानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
या अपघातात मनीष शर्मा आणि त्याची पत्नी अनिता, कैलाश शर्मा आणि त्यांची पत्नी संतोष, आणि सतीश शर्मा आणि त्यांची पत्नी पूनम यांचा अपघातात मृत्यू झाला. शर्मा यांची मुले मनन आणि दिपाली हे दोघे अपघतात जखमी झाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस आरोपी चालकाच्या शोधात आहे. बोन्ली पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद घेण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.