Patna University Murder Video: पाटणा लॉ कॉलेज कॅम्पसमध्ये एका 22 वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. सात ते आठ जणांनी त्याला मारहाण केली. या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. हर्ष राज असं मृत तरुणाचे नाव होते. हर्ष दुपारच्या वेळीस परिक्षा केंद्रावरून बाहेर आल्यानंतर त्याच्यावर हल्ला केला. मारहाणी नंतर तो गंभीर जखमी झाला होता.त्याला उपचासासाठी नेतात त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- होमिओपॅथी महिला डॉक्टरने पाळीव कुत्र्याचा चावा लहानशी जखम समजून Rabies Infection वर उपचार टाळणं जीवावर बेतलं
व्हायरल झालेल्या व्हिडिओत, सात ते आठ जण हर्षला मारहाण करताना दिसत आहे. हल्लेखोरांनी मास्क घातला आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात नाही. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी पथक नेमले आहे. हल्लेखोरांचा शोध सुरु आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अनेकांनी या वर संताप व्यक्त केला आहे.
पटना विश्वविद्यालय में दिनदहाड़े गुंडों द्वारा छात्र नेता हर्षराज की पीट पीट कर निर्मम हत्या कर दी।
शिक्षा के मंदिर में इस प्रकार की घटनाएं हो रही है तो देश की बहन बेटियों और भाइयों का ऐसे माहौल में शिक्षा का स्तर क्या होगा..?
भाजपा सरकार से शिक्षा के क्षेत्र में देश का छात्र… pic.twitter.com/e9qpNRs6ji
— Nirmal Choudhary (@NirmlChoudhary) May 27, 2024
मारहाणीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हर्षच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने हंबरडा फोडला आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेणार आहे. हर्ष विद्यार्थी संघाच्या निवडणूकीसाठी तयार झाला होता. त्याच्या विरोधांकानीच त्याची हत्या केल्याचा संशय आहे.