Lucknow Crime: प्रेमसंबंधाच्या संशयावरून पतीचा पत्नीवर कात्रीने हल्ला, लखनऊ येथील धक्कादायक घटना

भर बाजारात नवऱ्याने बायकोवर एकदा नव्हे तर १९ वेळा वार केले आहे.

Stabs with scissor (PC Pixabay)

Lucknow Crime: लखनऊमध्ये (Lucknow) एका व्यक्तीने आपल्या बायकोवर भर मार्केटमध्ये कात्रीने वार केले आहे. भर बाजारात नवऱ्याने बायकोवर एकदा नव्हे तर 19 वेळा वार केले आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केले आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.  ब्रिजमोहन निषाद असं आरोपीचे नाव आहे. बायकोवर जीवघेण्या हल्ला केल्याचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे. हा भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. हेही वाचा- वाढदिवशी लॉजवर नेलं अन् प्रेयसीची केली निर्घृण हत्या,

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिजमोहन निषाद हा डाळीगंज परिसराती राहतो. दुपारच्या वेळी नवरा बायको बाजारात गेले असताना त्याने बाजारात बायकोवर 19 वेळा धारदार कात्रीने वार केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनी संपात व्यक्त केला आहे. ही घटना शहरातील कुतुबपूर परिसरातील लांबकेश्वर पार्कजवळील भाजी मार्केटमध्ये घडली आहे. जखमी अवस्थेत पीडित महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय असल्याने पतीने रागाच्या भरात हल्ला केल्याचे समोर आले आहे.

आरोपी ब्रिजमोहन यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भात पीडित महिलेच्या मुलाने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला. या आधी ७ जानेवारीला आई भाजी आणायला गेली त्यावेळीस देखील आरोपीने पीडित महिलेवर हल्ला केला होता. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.