Karnataka Shocker! कर्नाटकातील शिवमोग्गा येथील सरकारी रुग्णालयातून कुत्राने तोंडात धरून नेलं नवजात अर्भक; बालकाचा मृत्यू

आश्‍चर्याची बाब म्हणजे यादरम्यान कोणाचीही नजर कुत्र्यावर पडली नाही. सुरक्षा रक्षकाने बाहेर पाहिले असता त्यांनी कुत्र्याच्या तावडीतून बालकाची सुटका केली. तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता.

Dog | Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

Karnataka Shocker: कर्नाटकातील शिवमोग्गा (Shivamogga) जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातून (Government Hospital) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे कुत्र्याने रुग्णालयात घुसून प्रसूती विभागातील नवजात अर्भकाला ओरबाडून बाहेर नेलं. आश्‍चर्याची बाब म्हणजे यादरम्यान कोणाचीही नजर कुत्र्यावर पडली नाही. सुरक्षा रक्षकाने बाहेर पाहिले असता त्यांनी कुत्र्याच्या तावडीतून बालकाची सुटका केली. तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता.

मॅकगॅन जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाने मीडियाला सांगितले की, त्यांना कुत्र्याच्या तोंडात मूल दिसले. मग तो त्याच्या मागे गेला. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातील प्रसूती वॉर्डात कुत्रा पळत होता. कुत्र्याच्या तावडीतून बालकाची सुटका करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. तोपर्यंत बालकाचा मृत्यू झाला होता. (हेही वाचा - Rajasthan Shocking: उदयपूरमध्ये 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; आरोपीने केले मृतदेहाचे 10 तुकडे)

पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. मुलाच्या पालकांची अद्याप ओळख पटलेली नाही. शवविच्छेदनानंतरच बाळाच्या मृत्यूची नेमकी वेळ कळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, शवविच्छेदनानंतरच बाळाच्या मृत्यूची नेमकी वेळ कळू शकेल. पालकांची ओळख पटवण्याच्या प्रयत्नात गर्भवती महिलांच्या नोंदींची पडताळणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जवळपासच्या सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयांची तपासणी सुरू केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now