Mumbai Murder: मित्राच्या पत्नीच्या चारित्र्यावरून कमेंट करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले; संतापलेल्या पतीने त्याच्या शरिराचे केले 12 तुकडे

मृत व्यक्ती हा आरोपीच्या घरी पार्टीला गेला होता.

Mumbai Murder: मित्राच्या पत्नीच्या चारित्र्यावरून कमेंट करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले; संतापलेल्या पतीने त्याच्या शरिराचे केले 12 तुकडे
Crime | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) येथून सर्वांनाच हादरून टाकणारी घटना समोर आली आहे.आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर कमेंट केली म्हणून एका व्यक्तीने आपल्या मित्राचीच हत्या (Murder) केली आहे. त्यानंतर आरोपीने मृताच्या शरिराचे 12 तुकडे केले आणि एका सुटकेसमध्ये भरून नाल्यात फेकला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत व्यक्ती हा आरोपीच्या घरी पार्टीला गेला होता. त्यावेळी त्याने आरोपीच्या पत्नीच्या चारित्र्यावर कमेंट केली. याच वादातून हत्या झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

सुशील कुमार सरनाईक असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुशील हा चार्ल्‍स नाडर (वय, 41) यांच्या घरी पार्टीला गेला होता. त्यावेळी सुशीलने चार्ल्‍सची पत्नी सलोमी (वय, 31) हिच्या चारित्र्यावर कमेंट केली. त्यावेळी चार्ल्‍सला राग अनावर झाला आणि त्याने सुशीलचा गळा आवळून हत्या केली. एवढ्यावर न थांबताच चार्ल्‍सने सुशीलच्या शरिराचे 12 तुकडे केले आणि एका सुटकेसमध्ये भरून नाल्यात फेकला. परंतु, मुलगा घरी न परतल्यामुळे सुशीलच्या आईने त्याच्या मित्राकडे चौकशी केली. मात्र, कोणतीही माहिती न मिळाल्याने सुशीलच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. हे देखील वाचा- Indore Double Murder: इंदूरमधील 'त्या' दुहेरी हत्येचे गूढ उकलले; प्रियकराच्या मदतीने एका अल्पवयीन मुलीनेच केला आई-वडिलांचा खून

दरम्यान, नेरूळ पोलिसांना एका सुटकेसमध्ये तुकडे केलेला आढळून आला. त्यानंतर नेरुळ पोलिसांनी वर्ली पोलिसांना याबाबत माहिती दिली. हा मृतदेह सुशील कुमार सरनाईक याचाच असल्याची पोलिसांना ओळख पटली. चौकशी दरम्यान, चार्ल्‍स यानेच सुशीलची हत्या केल्याची तपासून उघड झाले.

(The above story first appeared on LatestLY on Dec 18, 2020 07:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).