Delhi: पीपीई कीट घालून आला अन् 13 कोटींचे दागिने लुटून गेला; संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
ही घटना दिल्लीतील (Delhi) कालकाजी परिसरात (Kalkaji) मंगळवारी रात्री घडली आहे.
पीपीई कीट (PPE Kit) घालून एका ज्वेलर्सच्या दुकानातून (Jewellery Shop) कोट्यवधी रुपयांचे दागिने चोरी (Theft) करून पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना दिल्लीतील (Delhi) कालकाजी परिसरात (Kalkaji) मंगळवारी रात्री घडली आहे. त्यानंतर बुधवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी कालकाजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिसांनी 24 तासांत चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र, सुरक्षा रक्षक तैनात असतानाही ज्वेलर्सच्या दुकानात चोरी झाल्याने आसपास राहणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद शेख नूर असे चोरी केलेल्या आरोपीचे नाव आहे. मोहम्मद हा इलेक्ट्रिशन असून हुबळीचा रहिवाशी आहे. दरम्यान, मोहम्मदने दिल्लीतल्या कालाकाजी परिसरात असलेले अंजली ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करण्याची त्याने कल्पना आखली. त्यानुसार, तो मंगळवारी रात्री ९.३० सुमारास या दुकानात शिरला आणि पहाटे 3.50 दागिने चोरी करून पळून गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पीपीई कीटचा गैरवापर केल्याचे दिसत आहे. मात्र, कालकाजी पोलिसांनी केवळ 24 तासांत त्याला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून 13 कोटींचे दागिने हस्तगस्त केले आहे. हे देखील वाचा- Uttar Pradesh: लग्नाआधीच होणाऱ्या बायकोसाठी शॉपिंग करताय? उत्तर प्रदेशमधील ही माहिती वाचल्यानंतर उडेल झोप
एएनआयचे ट्वीट-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद हा दुसऱ्या इमारतीवरून आत ज्वेलर्सच्या दुकानात शिरला. त्यानंतर त्याने दागिने एका बॅगेच भरले आणि ती बॅग रिक्षातून घेऊन गेला. परंतु, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने त्याला अटक करण्यास पोलीसांना यश आले आहे. सध्या मोहम्मदची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. चोरीच्या या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण पाहायला मिळत आहे.