Uttar Pradesh Assaulted Video: दोघांमध्ये जमिनीचा वाद पेटला, मध्यस्थी करायला गेलेल्या तहसीलदाराला कानशीलात मारली
उत्तर प्रदेशातील जसराणा तहसील भागातील नागला तुर्सी येथे तहसीलदरा आणि महसूल पथकांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Uttar Pradesh Assaulted Video: उत्तर प्रदेशातील जसराणा तहसील भागातील नागला तुर्सी येथे तहसीलदरा आणि महसूल पथकांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ (Video) व्हायरल होत आहे. दोन व्यक्तींमध्ये जमिनीच्या वाद झाला होता तर तहसीदार आणि महसूल विभागाचे अधिकारी त्यांना मध्यस्थी करण्यासाठी गेले होते. मध्यस्थी दरम्यान तहसीलदारांसोबत गैरवर्तन केले. (हेही वाचा-रस्त्यावरून जाताना दुचाकीने कट मारल्यावरून वाद, दोन गटात मारामारी, 4 जण जखमी)
मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीचा वाद दोन गटांमध्ये पेटला. त्यांना मध्यस्थी करण्यासाठी तहसील कार्यालयातील अधिकारी घटनास्थळी आले. घटनास्थळी दोघांन्ही घटनास्थळी आलेल्या तहसीलदारांशी गैरवर्तन केले. एकाने कानाखाली मारली. ही संपुर्ण घटना एकाने फोनमध्ये कैद केली. या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन जणांना अटक केले.
धर्मेंद्र आणि वीरेश्वर अशी दोन आरोपींची नावे आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, वादविवाद झालेल्या ठिकाणी लोकांनी गर्दी केली आहे.
#फ़िरोज़ाबाद में तहसीलदार साहब गरीब किसान की “मज़बूती” सम्भाल नहीं पाए…एक कन्टाप में ही ज़मीन में लोट गए…ये वाकिया एक बार नहीं दो बार हुआ…@myogiadityanath जी आपके अफसर तो बड़े कमजोर हैं, इनको “BOOSTER” पिलवाइए pic.twitter.com/gMew9iU6gr
— Mamta Tripathi (@MamtaTripathi80) June 23, 2024
गैरवर्तन केल्या प्रकरणी अटक
पोलिसांनी दोघांना गैरवर्तन केल्याप्रकरणी अटक केले आहे. तहसीलदार ललता प्रसाद यांनी औपचारिक तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. दोघांवर शांतता भंग केल्याचा आरोप नोंदवण्यात आला आहे. या घटनेबाबत, फिरोजाबाद पोलिसांनी सांगितले की, जसराणा पोलिस ठाण्यात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2024 11:11 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

