Delhi Crime: दोन दरोड्यांनी बंदूकीचा धाक दाखवत चोरली ज्वेलरी बॅग, दिल्लीतील करवल नगर येथील घटना
दिल्लीत भररस्त्यात दरोड्यांनी एका ज्वेलरी शॉपच्या मालक आणि त्याच्या मुलाला बंदुकीच्या धाकावर बॅग लुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Delhi Crime: दिल्लीत भररस्त्यात दरोड्यांनी एका ज्वेलरी शॉपच्या मालक आणि त्याच्या मुलाला बंदुकीच्या धाकावर बॅग लुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. ही घटना दिल्लीतील करवल नगर विधानसभेतील सोनिया विहार येथे घडली आहे. 18 फेब्रुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरोड्यांनी घटनास्थळी गोळीबार केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. दिल्लीत वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण पाहून नागिरकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहे.
Video caution ⚠️
देखिए दिल्ली में बेखौफ बदमाश लूट के लिए गोलियां चला रहे हैं
सोनिया विहार डकैती के प्रयास का मामले का सीसीटीवी आया सामने जिसमे दिखाई दे रहा है कि बदमाश कैसे पिता और बेटे के साथ उनका बैग छीनने की कोशिश कर रहे है जब विरोध किया तो उनके सर पर पिस्टल की बट से वार… pic.twitter.com/n9ws0AWQgG
— Lavely Bakshi (@lavelybakshi) February 19, 2024
(The above story first appeared on LatestLY on Feb 19, 2024 03:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

