Gas Cylinder Explosion: दिल्लीमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटात एकाच परिवारातील सहा जणांचा मृत्यू
त्यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.
Gas Cylinder Explosion: दिल्लीच्या बिजवासन भागात (Bijwasan Area) जवळपासच्या दोन झोपडपट्ट्यांमध्ये ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीत गुरुवारी पहाटे गॅस सिलिंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी चार अल्पवयीन आहेत.
दुपारी साडेअकरा वाजता वाल्मिकी कॉलनी येथे ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीची माहिती मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर वाल्मिकी कॉलनीत सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रान्सफॉर्मरला आग लागली आणि त्यातील ज्वाला त्वरित जवळच्या दोन झोपडपट्ट्यांमध्ये पसरल्या, ज्यामुळे एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सिलेंडर स्फोटात कमलेश (32), त्यांची पत्नी बुथानी (32) आणि त्याच्या 16 आणि 12 वर्षांच्या दोन मुली आणि सहा आणि तीन वर्षांचे दोन मुलांचा मृत्यू झाला. (वाचा - Himachal: धक्कादायक! चंबा येथील 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सुलभ शौचालयात केले क्वारंटाइन)
दरम्यान, अग्निशमन अधिकार्यांसह पोलिस कर्मचार्यांनी मृतदेह बाहेर काढून सफदरजंग रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. पोलिसांनी कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.