Uttar Pradesh Video: नादुरुस्त बस चालकाविना रस्त्यावर धावली, धडक दिल्याने एक जण जखमी

ही घटना पंट्रोल पंपावर घडली आहे. एक नादुरुस्त बस अचानक चालकाविना पुढे जाऊ लागली आणि पेट्रोल पंपावर दुचाकीचा टायरमध्ये हवा भरणाऱ्या कर्मचाऱ्यावर बस धावली

bus accident pc tw

Uttar Pradesh Video: उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात घंटा घर रोडवर एक अपघात (Accident) झाला आहे. ही घटना पंट्रोल पंपावर घडली आहे. एक नादुरुस्त बस अचानक चालकाविना पुढे जाऊ लागली आणि पेट्रोल पंपावर दुचाकीचा टायरमध्ये हवा भरणाऱ्या कर्मचाऱ्यावर बस धावली. एवढे नाही बस पुढे जाऊन फुटपाथावर उभ्या असलेल्या दुसऱ्या बसला धडकली. या अपघातामुळे रस्त्यावर एकच गोंधळ उडाला.( हेही वाचा- अंधेरीमध्ये जोगेश्वरी-गुंदवली फ्लायओव्हरचा स्लॅब कारवर पडला, कोणतीही जीवितहानी नाही )

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात कर्मचारी जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घंटा घर रोडवरील टंडन पेट्रोल पंपावर बुधवारी ३ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास बस आली होती. बसचालक डिझेल भरण्यासाठी आला होता. इंधन भरत असताना बसमध्ये बिघाड झाला. चालकाने बस पेट्रोल पंपाच्या परिसरात बस उभी केली आणि चाकासमोर विटा लावल्या.

गुरुवारी ४ जुलै सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अचानक बस स्वत: हून पुढे जाऊ लागली. टायरमध्ये हवा भरणाऱ्या कर्मचाऱ्याला धडक दिल्याने तो जखमी झाला. तेजपाल असं जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून बस हटवली आहे. बसच्या चाकासमोरून विटा उलल्यामुळे आणि परिसरा उतारामध्ये असल्याने हा अपघात घडला.