Dehradun च्या 78 वर्षीय महिलेने Rahul Gandhi यांच्या नावावर केली आपली संपूर्ण संपत्ती; कारण ऐकूण तुम्हालाही बसेल धक्का!
पुष्पा मुंजियाल (Pushpa Munjial) यांनी डेहराडून न्यायालयात मृत्यूपत्र सादर केले असून, त्यांच्या मालमत्तेचे मालकी हक्क राहुल गांधी यांना दिले आहेत.
उत्तराखंड (Uttarakhand) ची राजधानी डेहराडूनच्या दलनवाला नेहरू रोड येथे राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने आपली संपत्ती काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandh) यांच्या नावावर केली आहे. याबाबत महिलेने न्यायालयात मृत्यूपत्र सादर केले. 78 वर्षीय महिलेने 50 लाखांची संपत्ती आणि 10 तोळे सोन्यासह तिची सर्व मालमत्ता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावावर केली आहे.
पुष्पा मुंजियाल (Pushpa Munjial) यांनी डेहराडून न्यायालयात मृत्यूपत्र सादर केले असून, त्यांच्या मालमत्तेचे मालकी हक्क राहुल गांधी यांना दिले आहेत. पुष्पा मुंजियाल यांनी राहुल गांधी आणि त्यांचे विचार देशासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, त्या राहुल गांधींच्या विचारांनी खूप प्रभावित आहेत. म्हणूनच त्यांनी आपली संपत्ती राहुल गांधी यांना दिली आहे. (हेही वाचा -Ganesh Temple Street in New York: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील रस्त्याला देण्यात आले ‘गणेश टेंपल स्ट्रीट’ नाव, Watch Viral Video)
काँग्रेसचे महानगर अध्यक्ष लालचंद शर्मा यांनी सांगितले की, पुष्पा मुंजियाल यांनी माजी प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह यांच्या निवासस्थानी राहुल गांधींना त्यांची संपत्ती विल केली. या वृद्ध महिलेने सांगितले की, देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत त्यांच्या कुटुंबाने नेहमीच देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. श्रीमती इंदिरा गांधी असोत वा राजीव गांधी, या दोघांनीही या देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी बलिदान दिले. अशा स्थितीत ती आपल्या मालमत्तेसाठी राहुल गांधींना सर्वात योग्य मानते.
वृद्ध महिलेला गांधी घराण्याची ओढ -
उत्तराखंड काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते प्रीतम सिंह यांनी पुष्पा मुंजियाल यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. प्रीतम सिंह यांनी सांगितले की, महिलेचे काँग्रेस आणि गांधी कुटुंबाशी घट्ट आसक्ती आहे. त्यामुळे तिने आपली संपत्ती राहुल गांधी यांच्याकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला.
सध्याच्या युगात लोक संपत्तीच्या वादात अडकले आहेत. मात्र, पुष्पा मुंजियाल यांचे हे पाऊल खूपचं कौतुकास्पद आहे. ही मालमत्ता राजधानीच्या अतिशय पॉश एरियामध्ये असून खूप मौल्यवान आहे.