Meerut Murder: धक्कादायक! बहिणीने नकार दिला म्हणून भावाने गोळ्या घालून केले ठार; कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) मेरठच्या (Meerut) भावनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटनेने सर्वांनाच हादरून टाकले आहे. या परिसरात बहिणीने कुत्र्यांसाठी भाकर बनविण्यास नकार दिला म्हणून तिच्याच भावाने गोळ्या घालून तिची हत्या केली आहे. त्यानंतर आरोपीने स्वत:च पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

आशिष असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आशिष हा गंगासागरजवळील कैलास वाटिका कॉलनी येथे कुत्रे सांभाळण्याचे काम करतो. आशिषने सोमवारी रात्री आपल्या मोठ्या बहिणीला (वय 26 वर्ष) कुत्र्यांसाठी भाकर बनवण्यास सांगितले. पण इतर कोणत्याही कामात व्यस्त असलेल्या बहिणीने भाकर तयार करण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या आशिषने तिला गोळी झाडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आशिषने स्वत: पोलिसांना याबद्दल माहिती दिली. माहिती मिळताच, पोलीस आरोपीच्या घरी पोहोचले आणि बंदुकीसह त्याला अटक केली. हे देखील वाचा- Bihar Acid Attack: पत्नीला जुगारात हारला, जुगारांनी केला सामूहिक बलात्कार; अत्याचाराविरोधात आवाज उठवल्यामुळे पतीनेच तिच्यावर फेकले अ‍ॅसिड

ट्विट-

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आरोपी आशिषकडे बंदूक आलीच कशी. ही बंदूक कोणाची आहे? बंदुकीचा अधिकृत परवाना आहे की नाही? याचा पोलीस तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.