लज्जास्पद! बापाने फासला नात्याला काळीमा; जन्मदात्याने केला 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, वडिलांचे कृत्य पाहून भावाने केली पोलिसांत तक्रार

हा नराधम बलात्कारानंतर मुलीला धमकावत असे. मात्र, वडिलांचे हे कृत्य पीडितेच्या भावाने पाहिले. यानंतर भावाने पोलीस ठाणे गाठले. नंतर हे प्रकरण बाल कल्याण समितीपर्यंत पोहोचले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील मधुसूदनगढ भागात वडिलांनी मुलीच्या नात्याला काळीमा फासल्याची घटना समोर आली आहे. जन्मदात्या पित्याने आपल्या 12 वर्षांच्या मुलीवर वर्षभरापासून बलात्कार केला. हा नराधम बलात्कारानंतर मुलीला धमकावत असे. मात्र, वडिलांचे हे कृत्य पीडितेच्या भावाने पाहिले. यानंतर भावाने पोलीस ठाणे गाठले. नंतर हे प्रकरण बाल कल्याण समितीपर्यंत पोहोचले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अनुसुया रघुवंशी यांनी सांगितले की, मधुसूदनगढ भागात राहणाऱ्या 12 वर्षीय विद्यार्थिनीने सांगितले की, तिचे वडील तिला घरात डांबून तिच्यावर बलात्कार करायचे. वडिलांनी मुलीला घराबाहेर पडू दिले नाही. यासोबतचं तो तिला मारहाण करून घरातून हाकलून देण्याची धमकी देत ​​असे. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने याबाबत कुणालाही काही सांगितले नाही. (हेही वाचा - माणुसकीला काळीमा! 13 वर्षीय मुलीवर 8 महिन्यांहून अधिक काळ 80 जणांचा बलात्कार; आरोपींना अटक)

पीडित मुलीच्या वडीलांनी 5 वर्षांपूर्वी पत्नीला घरातून हकलले होते. त्यानंतर तिने दुसरे लग्नही केले. यामुळे मुले वडिलांसोबत एकटेचं राहत होते. निवासी शाळेत शिकणारा भाऊ घरी आल्यावर वडिलांच्या या कृत्याचा पर्दाफाश झाला. मुलीने सर्व हकीकत भावाला सांगितली. एके दिवशी पीडितेच्या भावाने वडीलांना आपल्या बहिणीसोबत गैरवर्तन करताना पाहिले. त्यानंतर त्याने बहिणीसह पोलीस ठाणे गाठून संपूर्ण घटना सांगितली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बालकल्याण समितीला कळविण्यात आले.

बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अनुसुय्या रघुवंशी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत चौकशी करून पीडितेचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी सांगितले की, मुलगी खूप घाबरली होती. निवेदनानंतर रघुवंशी यांनी कारवाईसाठी पोलिसांना पत्र दिले. गुनाचे पोलीस अधीक्षक राजीव कुमार मिश्रा यांनी सांगितले की, आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले जिथून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.