Coronavirus in Pune: पुण्यामध्ये आज 6 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 4,903 इतका झाला आहे., अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
Coronavirus in Maharashtra: राज्यात आज 9,927 नव्या कोविड-19 रुग्णांची भर पडली असून 56 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12,182 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. त्यांनी काल दिल्लीत भाजप नेत्यांची भेट घेतली. ट्वीट-
अर्थमंत्री अजित दादा पवार जी यांनी अर्थसंकल्पात नागपूर-काटोल-नरखेड या देशातील पहिल्या ब्रॉडगेज मेट्रोला निधी मंजूर केला. 269 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात काटोल, नरखेड ही शहरे नागपूर मेट्रो मार्गाला जोडली जाणार आहेत, असे म्हणत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. ट्वीट-

वरळी च्या पोद्दार हॉस्पिटलमध्ये महापौर किशोरी पेडणेकर यांनी लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतः देखील बीकेसी कोविड लसीकरण केंद्रामध्ये जाऊन लस टोचून घेतली आहे.
महाराष्ट्रासह अनेक राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यातच अशिया खंडातील आणि मुंबई शहरातील सर्वात दाटीवाटीचा परीसर अशी ओळख असेल्या धारावी झोपडपट्टी परिसरात पुन्हा एकदा कोरोनाचे सावट पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून धारावीमध्ये कोरोना व्हायरस संक्रमितांची एक अंकी किंवा शून्य असलेली संख्या काल अचानक दोन अंकी झाली. आज दिवसभरात धारावीमध्ये COVID-19 संक्रमित 18 रुग्ण आढळले. गेल्या काही दिवसातील आकडेवारीत गाठलेला हा उच्चांक आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली आहे.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता मध्ये काल रेल्वेच्या एका इमारतीला आग लागली होती. या भीषण आगीमध्ये रेल्वे आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी मृत्यूमुखी पडले आहेत. दरम्यान या आगीच्या घटनेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबियांसाठी 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर गंभीररित्या जखमी असणार्यांसाठी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील कोलकाता मधील या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या 4 फायर फायटर, 2 रेल्वे कर्मचारी आणि पोलिस एएसआय यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्र सरकारचा दुसरा अर्थसंकल्प काल पार पडला आहे. या अर्थसंकल्पात राज्य सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. एवढेच नव्हेतर, महिलांसाठीही त्यांनी मोठी घोषणा केली आहे. याचा महिला वर्गांना अधिक फायदा मिळण्याची शक्यता आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)