Coronavirus: अहमदाबादमध्ये 8 नवीन कोरोना बाधित रुग्ण; गुजरात राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 82 वर पोहचली
त्यामुळे गुजरात (Gujarat) राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 82 वर पोहचली आहे. यातील केवळ तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. गुजरात आरोग्य विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
Coronavirus: अहमदाबादमध्ये (Ahmedabad) आज 8 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गुजरात (Gujarat) राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 82 वर पोहचली आहे. यातील केवळ तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. गुजरात आरोग्य विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 1200 हून अधिक झाली आहे. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत 50 पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. आज मध्य प्रदेशामध्ये एका 65 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच मध्य प्रदेशात आज 20 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 86 वर पोहचला आहे. तसेच आंध्र प्रदेशात कोरोनाचे नवे 43 रुग्ण आढळून आल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 87 वर पोहचला आहे. (हेही वाचा - Coronavirus: महाराष्ट्रात आणखी 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा बळी, मुंबईत 16 तर पुण्यात 2 नव्या रुग्णांची नोंद; राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 320 वर पोहचला)
गुजरातबरोबरचं महाराष्ट्रातदेखील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज राज्यात 18 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 320 वर पोहचला आहे. मुंबईमधील रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या कॉन्स्टेबलच्या संपर्कात आलेल्या आतापर्यंत 8 जणांना क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, रविवारी दिल्लीतील निजामुद्दीन मरकज या क्रार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती. यात अहमदनगर येथील 34 जणांनी उपस्थिती लावली होती. त्यामधील 2 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच या क्रार्यक्रमात सहभागी झालेल्या 60 पुणेकरांना आज क्वारंटाइन करण्यात आलं आहे.