Chhattisgarh: कोरोना झाल्यानंतर बनावट डॉक्टराने दिलेले होमिओपॅथिक औषध घेतल्याने एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, तर 5 जणांची प्रकृती गंभीर

5 लोकांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

8 members of a family dead in Chhattisgarh (Photo Credits: ANI)

Chhattisgarh: छत्तीसगडच्या बिलासपुरात (Bilaspur) एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला असून 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. कोरोनाची लक्षणे दिसताच या कुटुंबातील सदस्यांनी बनावट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कुटुंबीयांनी होमिओपॅथिक औषध (Homeopathic Medicine) घेतले होते. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ही घटना बिलासपूरच्या सिरगीट्टी पोलिस स्टेशन परिसरातील आहे. येथे कोर्मी गावात कुटुंबातील सर्व सदस्यांनी अल्कोहोल असलेले होमिओपॅथीचे औषध घेतले. त्यांनी ड्रॉसेरा 30 होमिओपॅथी औषध प्यायले. परंतु, त्यानंतर या सर्वांची प्रकृती ढासळण्यास सुरुवात झाली आणि एकामागून एक 8 लोकांचा मृत्यू झाला. (वाचा -COVID-19 Vaccine Tracker: 18-45 वयाच्या नागरिकांना कोविड 19 लसीकरणासाठी स्लॉट्स कधी उपलब्ध आहेत याची माहिती देतील या Websites!)

मृतांपैकी 4 जणांचे अंतिम संस्कार रात्रीच्या वेळी करण्यात आले होते, त्यामुळे ही बाब संशयास्पद बनली आहे. 5 लोकांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिलासपूरचे सीएमओ म्हणाले की, होमिओपॅथिक औषध पिल्याने कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला, तर 5 जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांनी ड्रॉसेरा 30 (ड्रॉसेरा 30) हे होमिओपॅथिक औषध प्यायलं होतं. ज्यात 91% अल्कोहोल आहे. या सर्व प्रकारानंतर बनावट डॉक्टर फरार झाला आहे.