Bengaluru Female Foeticide Case: धक्कादायक! बेंगळुरूमधील नेलमंगला येथील रुग्णालयात 74 भ्रूणहत्या; डॉक्टर आणि मालक फरार, Asare Hospital विरोधात गुन्हा दाखल

नेलमंगला टाउन पोलिस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या एफआयआरनुसार, हॉस्पिटलने गेल्या तीन वर्षांत 74 गर्भपात केले. परंतु हॉस्पिटलमध्ये झालेल्या गर्भपाताची कोणतीही नोंद रुग्णालयाने ठेवलेली नाही.

प्रतिकात्मक प्रतिमा Abortion | Pixabay.com

Bengaluru Female Foeticide Case: बेंगळुरू (Bengaluru)मधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. बेकायदेशीरपणे गर्भपात (Abortion) केल्याप्रकरणी बेंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील नेलमंगा (Nelamangala) येथे असरे रुग्णालयाविरुद्ध (Asare Hospital) एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नेलमंगला टाउन पोलिस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या एफआयआरनुसार, हॉस्पिटलने गेल्या तीन वर्षांत 74 गर्भपात केले. परंतु हॉस्पिटलमध्ये झालेल्या गर्भपाताची कोणतीही नोंद रुग्णालयाने ठेवलेली नाही. यासंदर्भात News9live ने वृत्तप्रकाशित केलं आहे.

रिपोर्ट्सनुसार, आसरे रुग्णालयाविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आयपीसी कलम 312 (स्वेच्छेने मूल असलेल्या महिलेचा गर्भपात), 313 (संमतीने नसलेला गर्भपात), 315 आणि 1971 च्या गर्भपात कायदा अंतर्गत आसरे रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा -Karnataka Abortion Racket: कर्नाटकमध्ये तब्बल 3000 स्त्रीभ्रूण हत्या; गर्भपात रॅकेट तपासात झाले धक्कादायक खुलासे)

रूग्णालयावर एफआयआर दाखल झाल्यानंतर रुग्णालयात काम करणारे डॉ. रवी कुमार फरार आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज, रजिस्टर्स आणि हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांची आणि गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या स्कॅनिंग मशीनची माहिती गोळा करण्यास सांगितले आहे. (वाचा - Abortion Pill Case Bengaluru: गर्भपाताची गोळी घेतल्याने 33 वर्षीय महिलेचा मृत्यू, गुन्हा दाखल)

दरम्यान, बेंगळुरू ग्रामीण जिल्ह्याचे डीएचओ सुनील कुमार यांनी सांगितले की, 'हॉस्पिटल योग्य परवान्याशिवाय चालत असल्याचे आढळल्यास ते जप्त केले जाईल. माझ्या लक्षात आले आहे की, नेलमंगला येथील आसरे हॉस्पिटलने त्यांनी केलेल्या गर्भपाताची नोंद ठेवली नाही. रुग्णालयाविरुद्ध एमटीपी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जर हॉस्पिटल परवान्याशिवाय चालत असल्याचे आढळल्यास आम्ही ते जप्त करू.'