Madhya Pradesh: 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला 7 वर्षाचा मुलगा; बचावकार्य सुरू, 4 दिवसांत दुसरी घटना

येथे प्रियांश नावाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला.

Borewell | (File Photo)

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील दमोह येथे रविवारी 7 वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये (Borewell) पडला. 300 फूट खोल बोअरवेल व्यवस्थित झाकले गेले नाही, त्यामुळे ही घटना घडली. बचावकार्य जोरात सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे, गेल्या 4 दिवसांत मध्य प्रदेशात बोअरवेलमध्ये मुलाच्या पडण्याची ही दुसरी घटना आहे.

दमोह जिल्हा मुख्यालयापासून 45 किमी अंतरावर असलेल्या पटेरा पोलीस ठाण्याच्या बारखेडा गावात ही घटना घडली. येथे प्रियांश नावाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. पटेरा पोलिस स्टेशनचे प्रभारी श्याम बिहारी मिश्रा यांनी सांगितले की, ही बोअरवेल मुलाचे वडील धर्मेंद्र यांनी त्यांच्या शेतात खोदली होती. प्रियांश येथे खेळत असताना दुपारी एकच्या सुमारास तो त्यात पडला. (वाचा - Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात'मध्ये केली टांझानियाच्या सोशल मीडिया स्टार Kili Paul ची प्रशंसा, काय म्हणाले PM जाणून घ्या)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10-15 फूट खोलीच्या बोअरवेलमध्ये मुलगा अडकला आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी बचावकार्यास सुरूवात केली आहे. स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत.

याआधी गुरुवारी तीन वर्षांचा मुलगा 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला होता. उमरिया जिल्ह्यातील बदरचाड गावात ही घटना घडली. 16 तासांच्या बचावकार्यानंतर मुलाला बाहेर काढण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.