Haryana Shocking: हरियाणात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; आई-वडील, दोन मुली आणि पत्नीला विष देऊन मुलाने घेतला गळफास
यामध्ये त्यांनी त्यांच्या कंपनीच्या मालकाला मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. सुखविंदर सिंग हा यमुनानगर जिल्ह्यातील एका दुचाकी कंपनीत कामाला होता.
Haryana Shocking: हरियाणातील अंबाला (Ambala) येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात दोन मुलांचाही समावेश आहे. अंबाला शहरातील बलाना गावात (Balana Village) एकाच कुटुंबातील 5 जणांना विषारी द्रव्य प्राशन करण्यात आले. यानंतर कुटुंबातील एका सदस्याने गळफास लावून आत्महत्या केली. मृतांमध्ये 65 वर्षीय संगत सिंग, त्यांची पत्नी महिंद्रा कौर (62), संगत सिंग यांचा मुलगा सुखविंदर सिंग (32), सुखविंदर यांची पत्नी प्रमिला (28) आणि त्यांच्या 6 आणि 8 वर्षांच्या दोन मुलींचा समावेश आहे.
सुखविंदर हा यमुनानगर येथील इफ्को टोकियो कंपनीत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. फाशी घेण्यापूर्वी सुखविंदरने सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये त्यांनी त्यांच्या कंपनीच्या मालकाला मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. सुखविंदर सिंग हा यमुनानगर जिल्ह्यातील एका दुचाकी कंपनीत कामाला होता. एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच अंबाला शहरातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (हेही वाचा - Crime: जेवणावरून झालेल्या वादानंतर पत्नीची केली हत्या, आत्महत्या केल्याचे सांगत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणारा पती अटकेत)
घटनास्थळी पोहोचलेल्या फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने एक सुसाईड नोट जप्त केली असून त्यात लाखोंच्या व्यवहाराचा उल्लेख आहे. त्याचवेळी एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
डीएसपी अंबाला जोगिंदर शर्मा यांनी सांगितले की, दोन मुलांसह एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. यासोबतच क्राईम टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळावरून आम्हाला सुसाईड नोट सापडली आहे. या प्रकरणाची पाहणी सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण समजेल, असंही शर्मा यांनी सांगितलं आहे.