Faridabad Businessman Family Suicide Case: फरीदाबादमध्ये 6 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न, कर्जाच्या दबावातून व्यापारी कुटुंबाने कापल्या हाताच्या नसा

तर 5 जणांवर उपचार सुरू आहेत. हे प्रकरण फरिदाबादच्या सेक्टर-37 चे आहे. जिथे, स्थानिक तूप आणि खाद्यतेल व्यावसायिक आणि कुटुंबातील 5 सदस्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

Faridabad Businessman Family Suicide Case: फरीदाबाद (Faridabad) मध्ये एका व्यावसायिकाच्या कुटुंबाने कर्जाच्या दबावाखाली भयानक पाऊल उचलले आहे. कुटुंबातील सहा जणांनी हाताची नस कापून आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला. यातील एका व्यक्तीला रुग्णालयात नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. तर 5 जणांवर उपचार सुरू आहेत. हे प्रकरण फरिदाबादच्या सेक्टर-37 चे आहे. जिथे, स्थानिक तूप आणि खाद्यतेल व्यावसायिक आणि कुटुंबातील 5 सदस्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

या लोकांनी गुरुवारी रात्री हाताच्या नसा कापल्या. त्यानंतर, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सर्वांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. येथे 70 वर्षीय श्याम लाल गोयल यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांची 67 वर्षीय पत्नी साधना गोयल, 45 वर्षीय मुलगा अनिरुद्ध गोयल, 42 वर्षीय पत्नी निधी गोयल, अनिरुद्ध यांचा 19 वर्षीय मुलगा धनंजय गोयल आणि हिमांक गोयल यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. (हेही वाचा -Rajastan Shocker: विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न, भावजयीचा पराक्रम कॅमेऱ्यात कैद)

प्राप्त माहितीनुसार, श्याम लाल यांचा दिल्लीतील चांदनी चौक येथे खारी बबलीमध्ये देशी तूप आणि खाद्यतेलाचा व्यवसाय असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने दिल्लीतील एका व्यक्तीकडून मोठे कर्ज घेतले होते. त्याची परतफेड करण्याचा त्याच्यावर दबाव होता. गुरुवारी, रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास तिघेजण कर्ज काढण्यासाठी कार घेऊन आले होते. हे लोक आत जाऊ लागताच घरात उपस्थित असलेल्या परदेशी जातीच्या कुत्र्यांनी हल्ला केला. या लोकांनी घराचे गेट तोडले. पण, आत जाता आले नाही. यानंतर आरोपींनी घराच्या गार्डला कारमध्ये सोबत नेले. यानंतर, सुरक्षा रक्षकाला दिल्लीतील लाजपत नगरमध्ये सोडण्यात आले. गार्ड घरी परतला तेव्हा त्याला तिथे पोलिस दिसले. (हेही वाचा- इगतपुरी येथील भावली धरणात 5 जणांचा बुडून मृत्यू; उजनीमध्येही बोट उलटून 4 बेपत्ता)

अनिरुद्ध गोयल त्याच्या मित्राचा कॉल उचलत नसल्याचे सांगण्यात येत आहे. बराच वेळ फोन न आल्याने एक मित्र त्यांच्या घरी आला. त्यानंतर सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. यानंतर त्यांनी आवाज करून शेजाऱ्यांना जागे केले. त्यानंतर 112 वर माहिती देऊन पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी श्याम लाल गोयल यांचा मृतदेह बीके रुग्णालयात ठेवला आहे. साधना गोयल आणि निधी गोयल यांची प्रकृती खराब असल्याचे सराय ख्वाजाचे एसएचओ यांनी सांगितले. पोलीस आरोपींचा तपास करत आहेत.