PM CARES Fund द्वारे देशात सुरू करण्यात येणार 551 मेडिकल ऑक्सिजन प्लांट; मोदी सरकारचा मोठा निर्णय

पंतप्रधान मोदींनी पीएम केयर्स फंडमधून देशात 551 वैद्यकीय ऑक्सिजन बनवणाऱ्या प्लांटना मंजुरी दिली आहे.

Oxygen Cylinders (Photo Credits: ANI)

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची गरज आहे. मात्र, सध्या देशात मेडिकल ऑक्सिजनची (Medical Oxygen) कमतरता भासत आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. देशातील ऑक्सिजनची कमतरता कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे. देशातील पीएम केयर्स फंडमधून (PM CARES Fund) शासकीय रूग्णालयात 550 हून अधिक ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प स्थापित केले जाणार आहेत.

पंतप्रधान मोदींनी पीएम केयर्स फंडमधून देशात 551 वैद्यकीय ऑक्सिजन बनवणाऱ्या प्लांटना मंजुरी दिली आहे. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, पंतप्रधानांनी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची उपलब्धता वाढविण्याच्या दिशानिर्देशानुसार सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या अंतर्गत 551 समर्पित वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प स्थापित करण्यासाठी पीएम कॅयर्स फंडकडून निधी वाटप करण्यासाठी सैद्धांतिक मान्यता दिली आहे. (वाचा - Covid-19 Second Wave in India: कोरोनाविरुद्धच्या दुसऱ्या लाटेत भारताला जगभरातून मदतीसाठी पाठिंबा; पाकिस्तान ते अमेरिका अनेक देश आले पुढे)

हे ऑक्सिजन प्लांट लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत. हे ऑक्सिजन प्लांट विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील जिल्हा मुख्यालयातील सरकारी रुग्णालयात स्थापित करण्यात येतील. जिल्हा मुख्यालयातील सरकारी रूग्णालयात पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांट स्थापित करण्यामागील मूलभूत हेतू सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करणे आणि या प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन निर्मितीची सुविधा सुनिश्चित करणे हा आहे.

या ऑक्सिजन प्लाटद्वारे रुग्णालये व जिल्ह्यातील दैनंदिन वैद्यकीय ऑक्सिजनची गरज भागवता येईल. कोविड रुग्ण आणि इतर रुग्णांनाच्या उपचारासाठी जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्यात अचानक व्यत्यय येऊ नये आणि ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी ही यंत्रणा महत्त्वपूर्ण ठरेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif